लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देवनगर येथील कइलेक्ट्रिकल्स कंपनीच्या कार्यालयात सोमवारी सकाळी भीषण आग लागली. गोकुल-केशव कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या माळ्यावर असलेले कार्यालय रविवारी बंद होते. सोमवारी सकाळी ८.३० वाजता नागरिकांना इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरून धूर निघताना दिसून आला. काही वेळातच इलेक्ट्रिक कंपनीच्या कार्यालयातील खिडक्यांमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याने नागरिकांनी अग्निशमन विभागाला सूचना दिली.माहिती मिळताच नरेंद्रनगर स्टेशनचे अधिकारी धर्मपाल नाकोड हे दोन गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले. तीन माळ्याच्या या इमारतीतील दुसऱ्या माळ्यावरील खिडक्यांमधून आगीच्या ज्वाळा व धूर निघत होता. अग्निशमन दलाचे कर्मचारी कंपनीच्या मुख्य दरवाजातून आत जाण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याने आत जाण्यात अडचण येत होती. थोड्या प्रयत्नानंतर खिडक्या आणि दरवाजांच्या काचा फोडून अग्निशमन दलाचे जवान आत घुसले. कार्यालयातील ११ सिलिंग पंखे, ४ एसी, ४ कॉम्प्युटर, १ झेरॉक्स मशीन, प्रिंटर, इनव्हर्टर, बॅटरी, फर्निचर, खुर्च्यांसह दस्तावेज जळून खाक झाले होते. सकाळी ११ वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतु धूर निघत असल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत पाणी टाकण्याचे काम सुरू होते. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु कार्यालयाचे ब्रँच मॅनेजर मनीष शुक्ला यांनी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तविली.
नागपुरात इलेक्ट्रिकल कंपनीच्या कार्यालयात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:12 AM
देवनगर येथील कइलेक्ट्रिकल्स कंपनीच्या कार्यालयात सोमवारी सकाळी भीषण आग लागली. गोकुल-केशव कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या माळ्यावर असलेले कार्यालय रविवारी बंद होते. सोमवारी सकाळी ८.३० वाजता नागरिकांना इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरून धूर निघताना दिसून आला. काही वेळातच इलेक्ट्रिक कंपनीच्या कार्यालयातील खिडक्यांमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याने नागरिकांनी अग्निशमन विभागाला सूचना दिली.
ठळक मुद्देदेवनगर येथील घटना : लाखो रुपयांचे साहित्य जळाले