लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात गेल्या वर्षभरात १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीतील शहरात १०४४ आगी लागल्या. यामध्ये ७१० लहान, १४० मध्यम आणि १९४ मोठ्या आगींचा समावेश आहे. यामध्ये ९१ कोटी ६७ लाख ७१ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले तर ९८ कोटी ५४ लाख ७२ हजार ५४० रुपयांची मालमत्ता वाचविण्यात महापालिकेच्या अग्निशमन विभागाला यश आले. तसेच शहराच्या हद्दीबाहेरील ९९ घटनांमध्ये ५० कोटी ४० लाखांची मालमत्ता वाचविली. अशाप्रकारे एकूण १४२.९४ कोटीची मालमत्ता वाचविण्यात यश आले.अग्निशमन विभागात कार्यरत असताना आणि कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करणाऱ्या जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिवस तर १४ ते २० एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे महापालिका अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातर्फे कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम न करता केवळ महापौर संदीप जोशी यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून आज मंगळवारी सकाळी १०.३० वाजता मनपाच्या सिव्हिल लाईन्स मुख्यालयात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येईल. यासोबतच अग्निशमन सेवा सप्ताहाच्या काळात अग्निसुरक्षेसंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.लंडनहून कराचीमार्गे १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईत गोदीत दाखल झालेल्या ‘एस.एस. फोर्ट स्टिकिंग’ या जहाजाचा स्फोट होऊन भीषण आग लागली. यात अग्निशमन दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या दिवसाचे स्मरण म्हणून अग्निशमन सेवेतील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. आगीच्या धोक्यासंदर्भात जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येतो.त्याच अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात मनपाच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातील हौतात्म्य पत्करलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. मनपाच्या अग्निशमन विभागातील स्थानाधिकारी गुलाबराव कावळे, फायरमन प्रभू कुहीकर, रमेश ठाकरे हे कर्तव्यावर असताना शहीद झालेत. या तिघांनाही यावेळी अभिवादन करण्यात येईल.आगींच्या घटनाव्यतिरिक्त इतर एकूण ७३७ आपात्कालीन घटनांची सूचना विभागाला प्राप्त झाली होती. त्यामध्ये विहीर व तलावांच्या घटनांचा समावेश होता. १४९ प्रकरणात १७ जण जखमी झाले तर ६७ जणांना मृतावस्थेत बाहेर काढण्यात आले.विभागाचे मूळ कार्य नसतानाही ३,१९० दूषित विहिरींचा उपसा करण्यात आला. त्यामध्ये मनपा झोनअंतर्गत प्राप्त अर्जानुसार विहिरींचा उपसा करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यास हातभार विभागाने लावला.३.६ कोटीचे उत्पन्नमनपाच्या अग्निशमन विभागातर्फे इमारत तथा व्यवसायाकरिता नाहरकत प्रमाणपत्राद्वारे, अग्निशमन सेवा शुल्क, निरीक्षण शुल्क, पाणीपुरवठा, विहीर उपसा तसेच मनपा हद्दीबाहरे पुरविण्यात आलेल्या अग्निशमन सेवेच्या माध्यमातून तीन कोटी सहा लाख ७९ हजार २९७ उत्पन्न प्राप्त झाले आहे.११० उपक्रम राबविलेप्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे अग्निसुरक्षा अभियानांतर्गत वर्षभरात एकूण ११० उपक्रम राबविण्यात आले. शाळा, कॉलेज, रुग्णालय इमारती, शासकीय व निमशासकीय इमारती, बँक, हिंदुस्तान पेट्रोलियम, लायन्स क्लब, हॉस्पिटल्स, क्लब, थिएटर, न्यायालय, मेट्रो रेल्वे, जीपीओ, हॉटेल्स इमारती आदी ठिकाणी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये सुमारे १४,४३० नागरिक सहभागी झाले होते. मॉकड्रिलच्या माध्यमातून आगीसंदर्भात सतर्क ता पाळण्यास सांगण्यात आले.
आज अग्निशमन सेवा दिन : आगीतून १४२.९४ कोटीची मालमत्ता वाचविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 12:21 AM
नागपूर शहरात गेल्या वर्षभरात १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीतील शहरात १०४४ आगी लागल्या. यामध्ये ७१० लहान, १४० मध्यम आणि १९४ मोठ्या आगींचा समावेश आहे. यामध्ये ९१ कोटी ६७ लाख ७१ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले तर ९८ कोटी ५४ लाख ७२ हजार ५४० रुपयांची मालमत्ता वाचविण्यात महापालिकेच्या अग्निशमन विभागाला यश आले.
ठळक मुद्देसेवा सप्ताहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून जनजागृती