लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा रोडवरील महालगाव कापसी येथील एका लाकूड गोदामाला बुधवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. अग्निशमन विभागाला सायंकाळी ५.२५ च्या सुमारास आगीची सूचना मिळाली. लगेच तीन फायर टेंडर व एक ब्राऊजर रवाना करण्यात आला. वृत्त लिहिपर्यंत अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी तैनात होत्या. विशेष म्हणजे गेल्या दहा दिवसातील ही तिसरी आगीची मोठी घटना आहे.यापूर्वी महालगाव कापसी येथील सुरुची मसालेच्या कोल्ड स्टोअरेजला १५ एप्रिलला आग लागली. अजूनही ही आग सुरूच आहे. त्यानंतर २३ एप्रिलला श्रीराम प्लास्टिक कारखान्याला आग लागली. यात कारखाना खाक झाला. बुधवारी पुन्हा आगीची घटना घडली. यामुळे अग्निशमन विभागाला चांगलीच धावपळ करावी लागली.मिळालेल्या माहितीनुसार, वर्धनमाननगर येथील रहिवासी समीर जायसवाल यांचे महालगाव कापसी येथील मारुती शोरुमच्या मागील भागात लाकडाचे गोदाम आहे. गोदाम परिसरातील मोकळ्या जागेतही लाकडाचा साठा केला आहे. आग थोड्याच वेळात इतरत्र पसरली. आग आटोक्यात आणण्यासाठी सुगतनगर, लकडगंज, सक्करदरा व सिव्हिल लाईन येथील अग्निशमन केंद्रातील गाड्या व कर्मचारी घटनास्थळी पाठविण्यात आले आहेत.
महालगाव कापसी येथे लाकूड गोदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:52 AM
भंडारा रोडवरील महालगाव कापसी येथील एका लाकूड गोदामाला बुधवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. अग्निशमन विभागाला सायंकाळी ५.२५ च्या सुमारास आगीची सूचना मिळाली. लगेच तीन फायर टेंडर व एक ब्राऊजर रवाना करण्यात आला. वृत्त लिहिपर्यंत अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी तैनात होत्या. विशेष म्हणजे गेल्या दहा दिवसातील ही तिसरी आगीची मोठी घटना आहे.
ठळक मुद्दे१० दिवसात आगीची तिसरी मोठी घटना