शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

फिरूनी नवे जन्मेन मी...मृत्यूला हरवून जिंकली आयुष्याची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:53 AM

एका भीषण अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने सहा महिने कोमात घालविले. त्यातून बाहेर निघल्यानंतरही मृत्यूशी संघर्ष सुरूच होता. शरीराचा उजवा भाग अर्धांगवायूने निरुपयोगी झाला आणि बोलणेही अशक्य झाले. पुढचे काही महिने या अवस्थेशी सामना करीत तिने सायन्स सोडून बारावीत कला विभागात (इंग्रजी माध्यम) प्रवेश घेतला. या विपरीत परिस्थितीत ती हरली नाही, लढली. तिची जिद्द, तिची झुंज व्यर्थ गेली नाही. एक वेळ डॉक्टरांनीही नकारात्मक अभिप्राय दिल्यानंतरही तिच्यासोबत होते ते आईवडिलांचे प्रयत्न आणि विश्वास. कला विभागात ९५.६ टक्के गुणांसह शहरातून टॉपर ठरलेली पाखी अरुणीकुमार मोर ही विद्यार्थिनी म्हणजे मृत्यूला हरवून आयुष्याची लढाई जिंकणे कशाला म्हणतात, याचे जिवंत उदाहरण होय.

ठळक मुद्देकला विभागात टॉपर पाखीची यशोगाथा

निशांत वानखेडे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका भीषण अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने सहा महिने कोमात घालविले. त्यातून बाहेर निघल्यानंतरही मृत्यूशी संघर्ष सुरूच होता. शरीराचा उजवा भाग अर्धांगवायूने निरुपयोगी झाला आणि बोलणेही अशक्य झाले. पुढचे काही महिने या अवस्थेशी सामना करीत तिने सायन्स सोडून बारावीत कला विभागात (इंग्रजी माध्यम) प्रवेश घेतला. या विपरीत परिस्थितीत ती हरली नाही, लढली. तिची जिद्द, तिची झुंज व्यर्थ गेली नाही. एक वेळ डॉक्टरांनीही नकारात्मक अभिप्राय दिल्यानंतरही तिच्यासोबत होते ते आईवडिलांचे प्रयत्न आणि विश्वास. कला विभागात ९५.६ टक्के गुणांसह शहरातून टॉपर ठरलेली पाखी अरुणीकुमार मोर ही विद्यार्थिनी म्हणजे मृत्यूला हरवून आयुष्याची लढाई जिंकणे कशाला म्हणतात, याचे जिवंत उदाहरण होय.पाखीने मिळविलेले यश संकटाशी झुंजणाऱ्या योद्ध्याप्रमाणे आहे. पाखी अभ्यासात अत्यंत हुशार व दहाव्या वर्गात ९८.८ टक्के गुणांसह शाळेतून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पाखीच्या गुणवत्तेची चाहूल लागली होती. तेवढ्याच आत्मविश्वासाने विज्ञान विभागात प्रवेश घेतला. अकरावीनंतर बारावी सुरू झाली. यावेळी दहावीपेक्षा अधिक यश मिळविण्याची जिद्द तिने बाळगली होती. पण नियतीला वेगळेच मंजूर होते. एक जीवघेणे संकट तिच्यावर ओढवले. एका भीषण अपघातात मेंदूला जबर मार लागला आणि ती थेट मृत्यूच्या दाढेत लोटल्या गेली. वडील अरुणीकुमार मोर हे उद्योजक, त्यामुळे लाडक्या मुलीच्या उपचारात त्यांनी सर्वस्व झोकून दिले. डॉक्टरांनी मात्र नकारात्मकता दर्शविल्याने आईवडील थोड खचले, पण अखेरपर्यंत प्रयत्न सोडायचे नाही, हा त्यांचा निर्धार. नागपूरनंतर मुंबईला उपचार सुरू केला. त्यांच्या विश्वासाला यश आले आणि सहा महिने कोमात राहिलेली पाखी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली. पण उजवा भाग अर्धांगवायूने निरुपयोगी ठरला होता व त्यात वाचाही गेली होती. डॉक्टरांनी तिला घरी नेण्यास सांगितले. हा वेळ त्यांच्यासाठी कठीण होता. पुढचे काही महिने वेगवेगळ्या उपचार पद्धती वापरत आईवडिलांनी पाखीला या जीवघेण्या अवस्थेतून बाहेर काढले. नवजात बालक जसे बोबडे बोलतात आणि पाय अडखळत चालतात, तसा पाखीचा नवा जन्म झाला होता.तिने विज्ञान सोडून हिस्लॉप कॉलेजमध्ये इंग्रजी माध्यमासह बारावी कला विभागात प्रवेश केला. मुलगी शक्य होईल तशी कॉलेजमध्ये येऊन अभ्यास करावी, रमावी ही आईवडिलांची जिद्द. तीही एखाद्या फायटरप्रमाणे झुंजायला सज्ज होती.शिक्षकांनी व मित्रांनीही तिच्या या अवस्थेत मोलाची साथ दिली. तिची झुंज, आत्मविश्वास आणि गुणवत्ता, आईवडिलांचा विश्वास यामुळे यश तिच्या पायाजवळ चालून आले. वर्षभरापूर्वी आयुष्याशी संघर्ष करणारी पाखी कला विभागात टॉपर ठरली. आजही तिचा उजवा भाग कमकुवत आहे, ती आधार घेऊन अडखळत चालते, संघर्ष करीतच बोलते व हातात पेनही घेता येत नाही. काहींना तिचा नवा जन्म आणि हे यश चमत्काराप्रमाणे वाटते. पण यामागे होता आईवडिलांचा विश्वास, डॉक्टरांचे प्रयत्न आणि पाखीने बाळगलेली ‘फिरूनी नवे जन्मेन मी...’ ही जिद्द.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालartकला