नागपूर : मध्य भारतातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे किंग्सवे हॉस्पिटल आपला प्रथम वर्धापन दिन रुग्णांना विशेष सोयी देऊन साजरा करीत आहे. ४ ते १३ डिसेंबरदरम्यान केवळ रुम रेंट, तपासणी आणि औषधांवर रुग्णांना पैसे खर्च करावे लागतील. इतर सेवा सर्वांसाठी नि:शुल्क असणार आहेत. ही सूट नॉन कोविड रुग्णांसाठी आहे, अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.
डॉ. राजू खंडेलवाल यांनी सांगितले, रुग्णालयाने एक वर्षाच्या कालावधीत अनेक उपलब्धी मिळविल्या आहेत. यात ३ जानेवारी रोजी ‘ग्लोबल असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिन’सोबत केलेल्या परिषदेत तीन हजाराहून अधिक भारतीय आणि फॉरेन डेलीगेट्स सहभागी झाले होते. नॉन मेट्रो शहरातील हे पहिलेच आयोजन होते. रॉयल कॉलेज ऑफ एडिनबर्ग (इंग्लंड ) या प्रतिष्ठित संस्थेचा ‘एमआरसीपी’ हा अभ्यासक्रम हॉस्पिटलमध्ये सुरू झाला. यातही किंग्सवे हॉस्पिटल देशातील अग्रणी हॉस्पिटल ठरले. डॉ. प्रमोद गांधी म्हणाले, महिला दिनी दहा हजाराहून अधिक महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. किंग्सवे हॉस्पिटलला २९ मे २०२० रोजी ‘क्लोज’ आणि नोव्हेंबर २०२० मध्ये ‘ओपन पीसीआर’साठी ‘एनएबीएल’चे प्रमाणपत्र मिळाले आहे. या प्रकारची मान्यता मिळवणारे हे पहिले रुग्णालय आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत ७५० हून जास्त कोविड रुग्णांवर उपचार करण्यात आले. पाचशेहून अधिक रुग्णांना टेलिफोनिक कन्सल्टेशन करण्यात आले. नुकतेच भारतातील पहिले ‘एऊटड हे प्रोसिजर’ करण्यात आले. डॉ. वासुदेव रिधोरकर म्हणाले, रुग्णालयाला किडनी प्रत्यारोपणासाठी मान्यता मिळाली. येथे अनुभवी डॉक्टर आणि त्यांची टीम सदैव सज्ज असते. रुग्णालयाने सामाजिक जबाबदारी पाडत अनेक रुग्णांवर नि:शुल्क उपचारदेखील केले आहेत. पत्रपरिषदेला हॉस्पिटलचे प्रबंध संचालक डॉ. प्रकाश खेतान, मेडिकल सर्व्हिसेसचे संचालक डॉ. सुब्रजीत दासगुप्ता, ऑपरेशन डायरेक्टर डॉ. मनोज नागपाल उपस्थित होते.