लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : शहरातील रहदारीस अडसर ठरणाारी तसेच नागरिकांना त्रास देणारी माेकाट जनावरे पकडण्याची नगरपालिका प्रशासनाने शुक्रवार (दि. २७) पासून माेहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी १४ जनावरे पकडण्यात आली. यात ११ गाई व तीन वासरांचा समावेश आहे. त्यांना शिवाजीनगर येथील काेंडवाड्यात ठेवण्यात आले आहे. या माेहिमेत आडकाठी निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दिली.
वाडी शहरात माेकाट गुरांचा वापर वाढला असून, त्यांचा शहरातील प्रत्येक राेड व चाैकात ठिय्या दिसून येताे. ही गुरे अपघातास कारणीभूत ठरतात. या गुरांमुळे शहरात वाहतूक काेंडीची नवीन समस्या निर्माण झाली. शिवाय, त्यांना बाजूला करायला किंवा हाकलायला गेल्यास ते नागरिकांना मारायला धावतात तर काही जनावरे पाठलाग करतात. या प्रकारामुळे महिला, तरुणी व मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नागरिकांच्या वाढत्या तक्रारींमुळे पालिका प्रशासनाने ही माेकाट गुरे पकडण्याची माेहीम हाती घेतली आहे. त्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली. पकडण्यात आलेल्या गुरांना शिवाजीनगरातील काेंडवाड्यात डांबले जात आहे. काेंडवाड्यातील गुरांच्या चाऱ्यापाण्याची व देखभालीची जबाबदारी त्या संस्थेवर साेपविण्यात आल्याची माहिती जुम्मा प्यारेवाले यांनी दिली.
काेंडवाड्यातील गुराचा मृत्यू झाल्यास किंवा ते आजारी पडल्यास त्याची चाैकशी करून संस्थेवर दंडात्मक कारवाई केली जाईल. ही जनावरे साेडावयाची असल्यास मालकाला आधी दंडाची रक्कम भरावी लागेल. त्या रकमेची पाेचपावती दाखविल्यानंतर ती जनावरे साेडली जाईल. पकडलेल्या गुरांची माहिती पालिकेच्या आराेग्य विभागाला मिळणार आहे. ही जनावरे कुणालाही परस्पर साेडता अथवा विकता येणार नाही. तसे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी सांगितले.
...
गुरांचा लिलाव, दंडात्मक कारवाई
वाडी शहरात ३०० च्या आसपास माेकाट जनावरे २४ तास फिरत असतात. या गुरांमुळे नागरिकांना त्रास हाेत असल्याने ती पकडण्याची माेहीम सुरू करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या गुरांच्या मालकांना नाेटीस बजावली जाणार आहे. माेठ्या जनावरासाठी प्रति दिवस १,२०० रुपये तर वासरासाठी प्रति दिवस ६०० रुपये दंड आकारला जाणार असून, चाऱ्याचे १०० रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहे. ही गुरे १५ दिवसाच्या आत न साेडल्यास त्यांचा लिलाव केला जाणार आहे.
...
७,८०० रुपयांचा दंड वसूल
पहिल्या दिवशी पकडण्यात आलेल्या गुरांपैकी पाच गाई व तीन वासरे साेडण्यात आली. यात गुरांच्या मालकांकडून गाईचे सहा हजार रुपये तर वासरांचे १,८०० रुपये असा एकूण ७,८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही माेहीम किमान दाेन महिने सुरू राहणार असल्याचेही मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी स्पष्ट केले.
270821\img-20210827-wa0112.jpg
फोटो:पकडलेली मोकाट गुरे