लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारपासून नामनिर्देशपत्र सादर करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी नागपूर लोकसभा मतदारसंघातून केवळ एकमेव अर्ज सादर करण्यात आला. रामेटक लोकसभेसाठी आणि काटोल येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही.नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी अब्दुल करीम अब्दुल गफूर (शकील पटेल) यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जात ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहदुल मुस्लीमिन पक्षाचा (एमआयएम) उल्लेख केला आहे. रामटेकमधून एकही अर्ज सादर झालेला नाही. काटोल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुद्धा पहिल्या दिवशी एकही अर्ज सादर झालेला नाही. पहिल्या दिवशी एकमेव अर्ज सादर झाला असला तरी रामटेक लोकसभा मतदार संघासाठी १९ इच्छुकांंनी ३५ अर्ज तर नागपूरमधून ४३ इच्छुकांंनी ५४ अर्ज असे एकूण ८९ अर्ज आतापर्यंत नेण्यात आले.
पहिल्या दिवशी नागपुरातून एकमेव अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:14 PM
लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारपासून नामनिर्देशपत्र सादर करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी नागपूर लोकसभा मतदारसंघातून केवळ एकमेव अर्ज सादर करण्यात आला. रामेटक लोकसभेसाठी आणि काटोल येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही.
ठळक मुद्देरामटेकमधून एकही अर्ज नाही : ६२ इच्छुकांनी नेले ८९ अर्ज