लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन दरम्यान रेल्वेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी विशेष पार्सल रेल्वेगाड्या, मालगाड्या चालविण्यात येत होत्या. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगार, नागरिकांसाठी श्रमिक स्पेशल आणि राजधानी एक्स्प्रेस चालविण्यात आल्या. रेल्वे मंत्रालयाने देशभरात १०० जोडी रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली. त्यानुसार ७ जोडी रेल्वेगाड्या नागपूरमार्गे धावणार आहेत. यातील २ गाड्या सोमवारी नागपुरात आल्या. या गाड्यातून ३३४ प्रवासी नागपुरात उतरले. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. तर ८८ प्रवासी या दोन रेल्वेगाड्यांनी विविध शहरात निघून गेले.मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी ५.३० वाजता ०२७२३ हैदराबाद-नवी दिल्ली तेलंगणा एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आली. या गाडीतून ६४ प्रवासी उतरले. तर सायंकाळी ५.५० वाजता या गाडीने १५६ प्रवासी रवाना झाले. रेल्वेगाडी क्रमांक ०२७९१ सिकंदराबाद-दानापूर पाटणा एक्स्प्रेस सायंकाळी ७.२० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आली. या गाडीने २४ प्रवासी नागपुरात आले. सायंकाळी ७.३४ वाजता १७८ प्रवासी या गाडीने रवाना झाले. सर्व प्रवाशांची नागपूर रेल्वेस्थानकावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली. नागपुरात उतरलेल्या प्रवाशांच्या हातावर शिक्का लावून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. रेल्वेस्थानकावर कन्फर्म तिकीट असलेले आणि मास्क घातलेल्या प्रवाशांनाच प्रवेश देण्यात आला. दोन्ही रेल्वेगाड्यांनी जाणारे प्रवासी ९० मिनिटे आधी रेल्वेस्थानकावर पोहोचले होते.कुलींना मिळाला नाही रोजगारराजधानी एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांसोबत सोमवारपासून ७ जोडी रेल्वेगाड्या सुरू झाल्यामुळे कुली बांधवांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु सोमवारी बहुतांश प्रवाशांनी ट्रॉली बॅगचा वापर केल्यामुळे त्यांना रोजगार मिळाला नाही. सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल माजिद यांनी १४६ कुलींपैकी ८ कुली दोन पाळ््यात काम करीत असल्याची माहिती दिली.
पहिल्याच दिवशी नागपूर रेल्वेस्थानकावर दोन रेल्वेगाड्या दाखल : ३३४ प्रवासी होम क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 1:33 AM
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन दरम्यान रेल्वेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी विशेष पार्सल रेल्वेगाड्या, मालगाड्या चालविण्यात येत होत्या. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगार, नागरिकांसाठी श्रमिक स्पेशल आणि राजधानी एक्स्प्रेस चालविण्यात आल्या. रेल्वे मंत्रालयाने देशभरात १०० जोडी रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली. त्यानुसार ७ जोडी रेल्वेगाड्या नागपूरमार्गे धावणार आहेत. यातील २ गाड्या सोमवारी नागपुरात आल्या. या गाड्यातून ३३४ प्रवासी नागपुरात उतरले. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले.
ठळक मुद्दे८८ प्रवासी रवाना, प्लॅटफॉर्मवर वाढली वर्दळ