लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंधश्रद्धा निर्मूलनविषयक ‘जादूटोणा विरोधी कायदा’ डिसेंबर २००५मध्ये पारित होऊनही सर्वच राजकीय पक्षांमधील राजकीय लाभाचे कारण पाहता तो लटकतच गेला. डिसेंबर २०१३ मध्ये हा कायदा विधिसंमतही झाला. मात्र अंमलबजावणी झाली नाही. मात्र, विद्यमान सरकारच्या उपमुख्यमंत्र्यांनी या कायद्याबाबत गांभीर्य घेतले असून, त्या अनुषंगाने आराखडाही तयार झाला आहे. त्यामुळे, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रथमच अनुकूल सरकार राज्याला मिळाले असून, कार्यकर्त्यांनी आता कामाला लागण्याचे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रो. श्याम मानव यांनी शुक्रवारी येथे केले.राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या पार्श्वभूमीवर अंनिसतर्फे रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘अंधविश्वास उन्मूलन राष्ट्रीय संमेलन २०२०’चे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी अंनिसचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे होते तर व्यासपीठावर कोषाध्यक्ष सुरेश अग्रवाल, महासचिव हरीश देशमुख, महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. बबनराव बेलसरे, सुरेश धुरमुरे, अॅड. गणेश येलगारे, गोविंद भंडारकर, प्रशांत सपाटे, रवी खानविलकर, हरिभाऊ पाथोटे, छाया सावरकर उपस्थित होते. अंनिससंदर्भात अनेक भ्रामक कल्पना पसरविण्यात आल्या. मात्र, अंनिसचे कार्य कोणत्याही धर्म किंवा ईश्वराच्या विरोधात नाही तर धर्म आणि ईश्वराचे नाव घेऊन फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबांच्या विरोधातील आहे, हे आता पटायला लागले आहे. नागपूर शहराची ओळखच ‘पोल खोल’ अशी झाली आहे आणि येथे अनेक भोंदूबाबांचे पितळ उघडे पाडले गेले आहे. गत सरकारने जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केवळ आश्वासने देण्याचे काम केले. त्यांची इच्छाही दिसली. मात्र, ते ज्या पक्षाचे आहेत, तो पक्ष अंधश्रद्धेला खतपाणी घालणाºया वचनांशी कटिबद्ध असल्याने आणि त्यांच्यावर प्रचंड दबाव असल्याने ते या कायद्यासंदर्भात तरतूद करू शकले नाहीत.मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: पुढाकार घेऊन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तयारी दर्शवली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने हा संपूर्ण आराखडा अमलात येणार असून, १ एप्रिलपासून सरकारमार्फत अभियानास सुरुवात होईल. त्याअनुषंगाने राज्यातील चार हजार शाळा व विविध जाहीर कार्यक्रमांची रूपरेखा आखण्यात आल्याचे मानव यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंधश्रद्धेविरोधात प्रबोधनकार ठाकरे यांचे स्मरण करून देत असल्याचे वारंवार कळते. त्यामुळे, हे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल आणि या पाच वर्षात जोमाने कामे करण्याचे आवाहन मानव यांनी कार्यकर्त्यांना केले.मात्र, वर्तमान आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: पुढाकार घेऊन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तयारी दर्शवली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने हा संपूर्ण आराखडा अमलात येणार असून, १ एप्रिलपासून सरकारमार्फत अभियानास सुरुवात होईल. त्याअनुषंगाने राज्यातील चार हजार शाळा व विविध जाहीर कार्यक्रमांची रूपरेखा आखण्यात आल्याचे श्याम मानव यांनी सांगितले. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंधश्रद्धेविरोधात प्रबोधनकार ठाकरे यांचे स्मरण करून देत असल्याचे वारंवार कळते. त्यामुळे, हे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल आणि या पाच वर्षात जोमाने कामे करण्याचे आवाहन मानव यांनी कार्यकर्त्यांना केले.इंदोरीकर महाराजांना विरोध करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नव्हेतप्रबोधक कीर्तनकाकार निवृत्ती देशमुख उपाख्य इंदोरीकर महाराजांना विरोध करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नव्हेत. सम-विषम तिथीसंदर्भात महाराजांनी जेव्हा माफी मागितली, तेव्हाच विषय संपलेला होता. आम्ही त्यांचा विरोध केलेला नाही, असे परखड मत अंनिसचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.कीर्तन-प्रबोधनासाठी इंदोरीकर महाराज मनोरंजनाचा भाग टाकतात. वारकऱ्यांच्या कीर्तन परंपरेत मनोरंजन नसते. त्यामुळे, इंदोरीकरांना कीर्तनकार म्हणावे का, असा प्रश्न आहे. तरीदेखील त्यांनी स्त्रियांविषयी अनादर करणारे वक्तव्य केले होते. सम-विषम तिथीचे त्यांचे वक्तव्य अवैज्ञानिक होते. वक्ता बरेचदा बोलण्याच्या ओघात वाहवत जातो. खूप कमी वक्ते न वाहवणारे आहेत. मात्र, त्यांनी माफी मागितल्यानंतर हा विषय तेव्हाच संपला. महाराजांना आता ही चांगली संधी आहे. त्यांना आपली चूक सुधारायची इच्छा दिसते तर त्यांना ही संधी देणे क्रमप्राप्त आहे. ते प्रबोधनाचे काम करत असतील तर त्यांचे स्वागत करतो. कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या त्यांच्या कीर्तनाला विरोध करणारे माझे कार्यकर्ते नाहीत. महाराज हे गुन्हेगार नाहीत आणि फसवणूक करणारे बाबाही नाहीत. म्हणून त्यांना संधी देण्याचे आवाहन प्रा. श्याम मानव यांनी केले.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रथमच अनुकूल सरकार : श्याम मानव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 9:23 PM
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रथमच अनुकूल सरकार राज्याला मिळाले असून, कार्यकर्त्यांनी आता कामाला लागण्याचे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रो. श्याम मानव यांनी शुक्रवारी येथे केले.
ठळक मुद्देअंनिसचे ‘अंधविश्वास उन्मूलन राष्ट्रीय संमेलन’