लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकरांना वेळेत कार्य पूर्ण करण्याचा परिचय देणाऱ्या नागपूर मेट्रोने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या टप्प्यात महामेट्रो नागपूरने वर्धा मार्गावरील मेट्रो रिच-१ कॉरिडोरमध्ये एटग्रेड सेक्शनवर मेट्रो ट्रॅकचे कार्य पूर्ण करून आता एलिव्हेटेड सेक्शनवर बुलंदच्या साहाय्याने ट्रॅकचे परीक्षण केले आहे.एअरपोर्ट साऊथ ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनदरम्यान हे परीक्षण करण्यात आले. दोन्ही स्टेशनदरम्यान १.५ कि.मी. अंतर असून अधिकाऱ्यांनी बुलंद इंजिनच्या माध्यमाने ट्रॅकचे परीक्षण केले. एलिव्हेटेड सेक्शनवर ट्रॅकचे यशस्वी परीक्षण झाल्यांनतर आता पुढच्या ट्रॅक परीक्षणासाठी देखील बुलंद पूर्णपणे तयार आहे.बॅटरीच्या साहाय्याने संचालित होणारे बुलंद प्रथम मिहान डेपोमधून एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशनवर आणण्यात आले. त्यानंतर एलिव्हेटेड सेक्शनवर बुलंद चालविण्यात आले. ट्रॅकचे कार्य व्यवस्थितरीत्या पूर्ण झाल्याची ग्वाही बुलंदने दिली. साधारणत: बुलंद इंजिन ट्रॅकच्या देखभाल करण्यासाठी वापरण्यात येते. यापूर्वी बुलंदचा यशस्वी प्रयोग एअरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान केला होता. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्ताच्या (सीएमआरएस) परीक्षणानंतर एअरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान यशस्वीरीत्या जॉय राईड संकल्पना राबवली जात आहे.
एलिव्हेटेड सेक्शनवर बुलंदचा पहिला प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:00 IST
नागपूरकरांना वेळेत कार्य पूर्ण करण्याचा परिचय देणाऱ्या नागपूर मेट्रोने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या टप्प्यात महामेट्रो नागपूरने वर्धा मार्गावरील मेट्रो रिच-१ कॉरिडोरमध्ये एटग्रेड सेक्शनवर मेट्रो ट्रॅकचे कार्य पूर्ण करून आता एलिव्हेटेड सेक्शनवर बुलंदच्या साहाय्याने ट्रॅकचे परीक्षण केले आहे.
एलिव्हेटेड सेक्शनवर बुलंदचा पहिला प्रवास
ठळक मुद्दे मेट्रो रेल्वे : ट्रॅकचे परीक्षण