लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावी आणि गतिमान पद्धतीने कारवाई व्हावी या दृष्टीने प्रस्तावित शक्ती कायद्याची चौकट अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राज्यातील निमंत्रित महिला तसेच वकील संघटनांसोबत विधिमंडळ समितीच्या बैठका घेण्यात येणार आहे. या समितीची पहिली बैठक उद्या सोमवारला नागपुरात विधान भवन येथे होणार असून निमंत्रित महिला व वकिल संघटनासोबत चर्चा होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे या बैठका होणार आहेत. यासाठी महिला संघटना व वकील संघटना या निमंत्रित राहणार आहेत. पहिली बैठक आज नागपूरमध्ये विधान भवन येथे होणार असून १९ जानेवारी मुंबई येथे तर २९ जानेवारीला औरंगाबाद येथे या बैठका होतील अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. यासाठी संबधितांनी आपले मत हे लेखी स्वरुपात आणावे. संबंधित तारखेला तिन्ही ठिकाणी दुपारी ३ वाजता निमंत्रित महिला संघटना तसेच सायं. ५ वाजता वकील संघटना असे वेळ देण्यात आली आहे.
या विधेयकाच्या मराठी व इंग्रजी प्रति शासकीय ग्रंथागार नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच शासकीय मुद्रणालय चर्नी रोड मुंबई येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच या विधेयकाची प्रत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. संबंधितांनी आपल्या सूचना सुधारणा निवेदनाच्या स्वरूपात तीन प्रतीमध्ये विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत, विधानमंडळ, बॅकबे रिक्लेमेशन मुंबई येथे किंवा a1.assem-bly.mls