शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

पहिल्या टप्प्यात मेट्रोचे दहा स्टेशन

By admin | Published: July 28, 2016 2:39 AM

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील दहा मेट्रो स्टेशनचे बांधकाम पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता

पुढील आठवड्यापासून बांधकामाला सुरुवात : कॉनकोर साइडिंगजवळ पहिले गर्डर नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील दहा मेट्रो स्टेशनचे बांधकाम पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. चे प्रबंध संचालक बृजेश दीक्षित यांनी बुधवारी व्यक्त केली. मटेरियल टेस्टिंगसाठी जागतिक दर्जाची लॅब स्थापन करण्यासाठी बुधवारी एनएमआरसीएल व ब्युरो वेरिटास, फ्रान्स यांच्यात सामंजस्य करार झाला. यानंतर पत्रकारांशी बोलताना दीक्षित यांनी सांगितले की, आयएल अ‍ॅण्ड एफएस इंजिनियरिंग अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, हैदराबादला सर्वच १० स्टेशनचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण करायचे आहे. यासाठी त्यांना ५३२.६७ कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. ही कंपनी काँग्रेसनगर ते खापरी दरम्यान सात एलिव्हेटेड व तीन एट ग्रेड (जमिनीवरील) मेट्रो स्टेशन उभारेल. मेट्रो रेल्वे प्र्रकल्पांतर्गत १६ जुलै रोजी पहिल्या गर्डरचे लॉचिंग करण्यात आले. २५ मीटर लांब व ५५ टन वजनाच्या काँक्रिटपासून तयार केलेले गर्डर मजबूत क्रेनच्या साहाय्याने उभारण्यात आले. याला नवीन विमानतळ व खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान मिहानमध्ये प्रस्तावित कॉनकोर साइडिंगच्या वरती लाँच करण्यात आले. या प्रकारचे ८१ गर्डर्स वर्धा रोडवरील कास्टिंग यार्डमध्ये तयार झाले आहेत. त्यांना लवकरच स्थापित केले जाईल. यामुळे ट्रॅक लिंकिंगचे काम सुरू होईल. विमानतळ ते सीताबर्डी दरम्यान एलिव्हेटेड मेट्रो सेक्शनमध्ये सेग्मेंटल बॉक्स गर्डर्सचा उपयोग केला जाईल. या भागाचे काम जामठा कास्टिंग यार्डमध्ये केले जात आहे. १८ सेगमेंट तयार झाले आहेत. त्यांना लवकरच वर्धा रोडवर खापरीच्या टोकाकडील पिलरवर स्थापित केले जाईल.(प्रतिनिधी) एनएमआरसीएल-ब्युरो वेरिटासमध्ये एमओयू नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात मटेरियल टेस्टिंगसाठी जागतिक दर्जाची लॅब स्थापन करण्यासाठी बुधवारी एनएमआरसीएल व ब्युरो वेरिटास, फ्रान्स यांच्यात सामंजस्य करार झाला.उद्योग भवन, सिव्हिल लाईन्स येथील येथील मेट्रो कार्यालयात एनएमआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर एनएमआरसीएलचे प्रकल्प संचालक महेश कुमार अग्रवाल व ब्युरो वेरिटास इंडिया लि. (फ्रान्स) चे संचालक डायरेक्टर उमेश जाधव यांनी स्वाक्षरी केली. ही लॅब वर्धा रोडवरील मुख्य प्रकल्प व्यवस्थापक कार्यालयाजवळ दोन तीन महिन्यात सुरू केली जाईल. या लॅबमध्ये काँक्रिट कन्स्ट्रक्शन सोबतच सिव्हिल वर्क्ससाठी मटेरियलची तपासणी केली जाईल. या लॅबचा फायदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागालाही होईल. या वेळी एनएमआरसीएल चे कार्यकारी संचालक एस. रामनाथ, रोलिंग स्टॉक डायरेक्टर सुनील माथुर, ब्युरो वेरिटासचे प्रॉडक्ट मॅनेजर डॉ. नागेंद्र, रुशीत पडालिया उपस्थित होते.