लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मान्सूनने शनिवारी विदर्भात धडक दिली. रात्री ८ च्या सुमारात नागपूर शहरात पाऊ न तासात शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले, उड्डाणपुलावर तसेच लोहापुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अनेक अपार्टमेंटमध्ये पाणी तुबंले. तर सिमेंटरोड लगतच्या तसेच सखल भागातील वस्त्यात पाणी शिरल्याने खळबळ उडाली. पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याने मान्सूनपूर्व तयारीच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या.अंबाझरी ले-आऊ ट येथील यशवंतनगरात पाणी शिरले, चंदननगर येथील हनुमान मंदीर परिसरात पाणी तुबंले. नागरिकांनी अग्निशम विभागाला याची माहिती दिली. यशवंतनगर व हनुमाननगर येथे अग्निशमन विभागाचे पथक तातडीने दाखल झाले. तुंबलेले पाणी काढण्याचे काम सुरू केले. गिट्टीखदान भागातील नर्मदा कॉलनी, फ्रेन्ड् कॉलनी, खरे- तारकुंडे नगर, नंदनवनचा सखल भागात रस्त्यावर पाणी साचले होते.मान्सूनच्या ढगांनी या वर्षी मुंबईच्या सोबतच विदर्भाच्या सीमेत शुक्रवारी धडक दिली. शनिवारी यवतमाळ, ब्रह्मपुरीपर्यंत मान्सून पोहचल्याची घोषणा हवामान खात्याने केली. दक्षिण विदर्भात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. सायंकाळी नागपुरात आकाशात ढग जमा झाले. रात्री आठच्या सुमारास पावसाच्या जोराच्या सरी आल्या. अद्याप नागपुरात मान्सूनचे ढग पोहचलेले नाही. मात्र येत्या २४ तासात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे.हवामान खात्यानुसार गेल्या २४ तासात मान्सून महाराष्ट्राच्या अर्ध्याहून अधिक भागात सक्रिय झाला आहे. शनिवारी मुंबई, ठाणे, अहमदनगर, परभणी, यवतमाळ, ब्रह्मपुरी मार्गे छत्तीसगडच्या राजनांदगांव पर्यंत पोहचला. पावसामुळे विदर्भातील तापमानात घट झाली आहे. नागपुरात मान्सूनच्या आगमनाची तारीख १०जून आहे. हवामान विभागाने याची घोषणा केली तर वेळेवर मान्सून पोहचणार आहे. शनविारी दिवसाला आर्द्रता ५४ ते ७८ टक्के होती. मात्र रात्री पाऊ स आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला.मंगरुळपीरमध्ये सर्वाधिक ११० मिमी पाऊसगेल्या २४ तासात विदर्भातील बऱ्याच भागात पाऊस झाला. मंगरूळपीरमध्ये सर्वाधिक ११० मिमी पावसाची नोंद झाली. वाशिममध्ये ९३, कारंजालाड येथे ९० मिमी, मालेगाव-नरखेड येथे ७०, मूर्तिजापूर, दारव्हा, आर्वी, दिग्रस, रिसोड येथे ५० मिमी, पुसद येथे ४०, यवतमाळ येते ३८, अकोला येथे २०, अमरावती येथे ८, ब्रह्मपुरीमध्ये ५ मिमी पावसाची नोंद झाली.गेल्या वर्षी झाला होता विलंब
नागपुरात पहिल्याच पावसात पाणी तुंबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 10:16 PM
मान्सूनने शनिवारी विदर्भात धडक दिली. रात्री ८ च्या सुमारात नागपूर शहरात पाऊ न तासात शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले, उड्डाणपुलावर तसेच लोहापुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अनेक अपार्टमेंटमध्ये पाणी तुबंले. तर सिमेंटरोड लगतच्या तसेच सखल भागातील वस्त्यात पाणी शिरल्याने खळबळ उडाली. पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याने मान्सूनपूर्व तयारीच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या.
ठळक मुद्देवाहतूक विस्कळीत : अंबाझरी ले-आऊ ट, चंदननगर, गिट्टीखदान भागात पाणी साचले