लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : झोप ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. परंतु पुरेशी झोप न झाल्यास, मानसिक आजार, मधुमेह, रक्तदाब व कॅन्सरचा धोका वाढतो. निद्रानाशाने जगभरात ३५ ते ५४ टक्के नागरिक पीडित आहेत़ यामुळे निद्रानाशाचे अचूक निदान व उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये राज्यातील पहिल्या ‘स्लिप लॅब’चे उद्घाटन शुक्रवारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी रेस्पीरेटरी व स्लिप मेडीसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम उपस्थित होते.अपूर्ण किंवा कमी दर्जाच्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक व्याधी जडतात़ ‘स्लिप अॅपनिया’ नावाचा आजार जागतिक स्तरावर चार टक्के वयस्क व्यक्तीमध्ये आढळतो़ त्याचप्रमाणे झोपेचा ‘रेस्टलेस लेग सिंड्रोम’ नावाचा आजार १० टक्के लोकांमध्ये आढळतो़ उशिरा झोपणारे किंवा रात्रपाळीत काम करण्याऱ्या व्यक्तीमध्ये गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची शक्यता असते. रात्री झोपेत घोरणे हा ‘स्लिप अॅपनिया’ या गंभीर आजाराचे लक्षण आहे. या आजारात श्वसनात अडथळा निर्माण होतो़ झोपेत अचानक श्वास थांबल्यामुळे मेंदूला आॅक्सिजनचा पुरवठा थांबतो व त्यामुळे झोपेच्या ‘सायकलमध्ये’ अडथळा निर्माण होऊन शारीरिक व मानसिक स्वरूपाचे गंभीर आजार होतात. यात हृदयविकाराचा झटका येणे, मधुमेह, मानसिक रोग, डोकेदुखी, स्मरणशक्ती कमी होणे, थॉयराईड, ग्रंथीचे आजार, वंंध्यत्व, लैंगिक समस्या, अॅसिडीटीचा त्रास होण्याची दाट शक्यता असते़ यामुळे निद्रानाशाचे निदान व उपचारासाठी ‘स्लिप लॅब’ महत्त्वाची ठरणार असल्याची माहिती डॉ. मेश्राम यांनी दिली,उद्घाटन कार्यक्रमाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यअधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील, विभाग प्रमुख डॉ. मुकुंद देशपांडे, डॉ. संजय रामटेके, डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. धनंजय सेलुकर, डॉ. पीपी देशमुख, डॉ. भावना सोनकुसरे, डॉ. बॅनर्जी, डॉ. अमोल समर्थ, मुख्य प्रशासकीय अधिकारी परशुराम दोरवे, नर्सिंग स्टाफ व निवासी डॉक्टर उपस्थित होते. संचालन डॉ. सुशांत मुळे यांनी केले तर आभार डॉ. रवी यादव यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. पंकज घोलप, डॉ. गोपाल सोलंकी, डॉ. प्रशांत, गीता मेश्राम यांनी सहकार्य केले.
राज्यातील पहिली स्लिप लॅब सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 10:16 PM
निद्रानाशाने जगभरात ३५ ते ५४ टक्के नागरिक पीडित आहेत़ यामुळे निद्रानाशाचे अचूक निदान व उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये राज्यातील पहिल्या ‘स्लिप लॅब’चे उद्घाटन शुक्रवारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या हस्ते झाले.
ठळक मुद्देनिद्रानाशाचे निदान व उपचार होणार : जगात रुग्णांचे प्रमाण ३५ ते ५४ टक्के