शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

नागपूर मेयो इस्पितळात पहिल्यांदाच ‘आॅर्गन रिट्रायव्हल ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 9:15 PM

एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४६ वर्षीय कुटुंब प्रमुखाची ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती होताच त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र त्या परिस्थतीतही पत्नीने आणि त्याच्या भावाने स्वत:ला सावरत अवयवदानाचा निर्णय घेतला. आपल्या व्यक्तीचे अस्तित्व कायम ठेवण्याच्या या निर्णयाने तीन रुग्णांना जीवनदान, तर दोघांना दृष्टी मिळाली. विशेष म्हणजे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पहिल्यांदाच ‘आर्गन रिट्रॉयव्हल’ म्हणजे मेंदू मृत व्यक्तीकडून अवयव काढण्याची प्रक्रिया पार पडली.

ठळक मुद्देखिलनानी यांच्याकडून तीन रुग्णांना जीवनदान : डॉ. केवलिया, डॉ. व्यवहारे व डॉ. गवळी यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४६ वर्षीय कुटुंब प्रमुखाची ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती होताच त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र त्या परिस्थतीतही पत्नीने आणि त्याच्या भावाने स्वत:ला सावरत अवयवदानाचा निर्णय घेतला. आपल्या व्यक्तीचे अस्तित्व कायम ठेवण्याच्या या निर्णयाने तीन रुग्णांना जीवनदान, तर दोघांना दृष्टी मिळाली. विशेष म्हणजे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पहिल्यांदाच ‘आर्गन रिट्रॉयव्हल’ म्हणजे मेंदू मृत व्यक्तीकडून अवयव काढण्याची प्रक्रिया पार पडली. अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया व न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांच्या पुढाकारामुळेच हे शक्य होऊ शकले.जरीपटका येथील राम काकुमल खिलनानी (४६) रा. जरिपटका असे त्या मेंदू मृत (ब्रेन डेड) व्यक्तीचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, व्यावसायिक असलेले राम खिलनानी हे २० जुलै रोजी आपल्या काही कामानिमित्त दुचाकीने गिट्टीखदान चौकातून जात असताना रस्ता दुभाजकावर धडकले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू होते. परंतु २५ जुलै रोजी मेयोच्या ‘ब्रेन स्टेम डेथ समिती’ने खिलनानी यांना मेंदू मृत घोषित केले. या समितीत शल्यचिकित्सक डॉ. सुनील लांजेवार, अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. नंदा गवळी व डॉ. वैशाली शेलगावकर यांचा समावेश होता. न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांनी यात पुढाकार घेऊन खिलनानी यांच्या पत्नी सिमरन, भाऊ ठाकूर व मेव्हणे गिरीश छाब्रिया यांना अवयवदानाची माहिती दिली. दु:खातही या कुटुंबाने अयवदानाला होकार दिला. याची माहिती झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटरच्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात डॉ. सुधीर टॉमी व नागपूर झोन कोआॅर्डिनेटर वीणा वाठोरे यांनी तातडीने पुढील प्रक्रिया पूर्ण केली. शासकीय रुग्णालय असल्याने आवश्यक कागदपत्रे व पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र, एवढेच नव्हे तर खिलनानी कुटुंबीयांना कुठलीच अडचणी जाऊ नये म्हणून डॉ. व्यवहारे यांनी गेल्या दोन दिवसात अथक परिश्रम घेतले. पोलिसांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळताच गुरुवारी अवयव काढण्यास सुरुवात झाली. खासगी पॅथालॉजीचे डॉ. मोहरील यांनीही भरीव मदत केली.नागपुरात ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’ला सुरुवात झाल्यानंतर हे ६४ व ६५वे मूत्रपिंड दान ठरले. राम खिलनानी यांचे एक मूत्रपिंड आॅरेंज सिटी हॉस्पिटल व दुसरे मूत्रपिंड केअर हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आले. तर दोन्ही बुबुळ मेयो रुग्णालयाच्या नेत्रपेढीला देण्यात आले.न्यू इरा हॉस्पिटलमध्ये सातवे यकृत प्रत्यारोपणन्यू इरा हॉस्पिटलमध्ये यकृत दाखल होताच एका ४७ वर्षीय महिला रुग्णावर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. या हॉस्पिटलमधील हे सातवे तर मध्य भारतातील आठवे यकृत प्रत्यारोपण आहे. येथील प्रसिद्ध यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना यांच्या नेतृत्वात व हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती, डॉ. नीलेश अग्रवाल व डॉ. निधिश मिश्रा यांच्या मार्गदर्शनात रात्री उशिरापर्यंत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू होती. चार महिन्यातच उभारले ‘एनटीओआरसी’मेयो रुग्णालयात ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायव्हल सेंटर’ (एनटीओआरसी) म्हणजे मेंदू मृतदात्याकडून अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू होण्यासाठी डॉ. मकरंद व्यवहारे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नामुळेच १४ मार्च २०१८ रोजी ‘एनटीओआरसी’चे प्रमाणपत्र मिळाले आणि चार महिन्यातच पहिले ‘आॅर्गन रिट्रायव्हल’ झाले.मोठी उपलब्धीमेयो रुग्णालयासारख्या छोट्या शासकीय रुग्णालयात ‘आॅर्गन रिट्रायव्हल’ होणे ही मोठी उपलब्धी आहे. या एका प्रयत्नामुळे तिघांना ज्ीावनदान मिळाले. आता ही प्रक्रिया थांबणारी नाही. ‘आॅर्गन रिट्रायव्हल’ ही सामूहिक जबाबदारी आहे. भविष्यात लवकरच मेयो रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणासाठीही प्रयत्न केले जातील.डॉ. मकरंद व्यवहारेविभाग प्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Organ donationअवयव दान