लाेकमत न्यूज नेटवर्क
केळवद : ग्रामीण भागात दुचाकी वाहने चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर (ता. रामटेक) शिवारात कारवाई करीत अट्टल वाहन चाेरट्यास अटक केली. त्याच्याकडून १ लाख ८ हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.
ताैसिफ इब्बू शेख (२१, रा. मनसर, ता. रामटेक) असे अटक करण्यात आलेल्या चाेरट्याचे नाव आहे. ग्रामीण भागातील वाहन चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्याची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माेहीम सुरू केली आहे. पथक रामटेक परिसरात गस्तीवर असताना त्यांना मनसर शिवारातील नाल्यावरील पुलाजवळ ताैसिफ संशयास्पद स्थितीत आढळून आला. पाेलिसांनी त्याला विचारणा केली असता, त्याने असंबद्ध उत्तरे दिली. त्यामुळे त्याची कसून चाैकशी करण्यात आली. यात त्याने त्याच्याकडे असलेली दुचाकी चाेरून आणल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला लगेच ताब्यात घेत त्याच्याकडून एकूण पाच दुचाकी जप्त केल्या.
या पाचही दुचाकींची किंमत १ लाख ८ हजार रुपये असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी सांगितले. शिवाय, त्याच्याकडून वाहन चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्याला पुढील तपासासाठी केळवद (ता. सावनेर) पाेलिसांच्या स्वाधीन केले आहे. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
...
पाच पाेलीस ठाण्यांतर्गत चाेरी
ताैफिक शेख याने रामटेक, पारशिवनी, केळवद, सावनेर व नागपूर शहरातील बेलतराेडी पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतून चाेरून नेलेल्या दुचाकी पाेलिसांनी जप्त केल्या आहेत. त्याच्याकडे असलेली एमएच-४०/एबी-४०६६ क्रमांकाची दुचाकी त्याने केळवद परिसरातून चाेरून नेली हाेती. त्याने बहुतांश दुचाकी शेतकऱ्यांच्या मालकीच्या चाेरून नेल्या हाेत्या आणि त्या गरीब व मजुरांना विकायच्या, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वीरेंद्र नरड यांनी दिली.