शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
2
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
3
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
4
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
5
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
6
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
7
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
8
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
9
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
10
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
11
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
12
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
13
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
14
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
15
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
16
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
17
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
18
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
19
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
20
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

विज काेसळून पाच बैल, वासराचा हाेरपळून मृत्यू

By निशांत वानखेडे | Published: April 19, 2023 8:13 PM

नागपूर जिल्ह्यात अवकाळीच्या वादळाचा कहर : शहरातही पडझड

नागपूर: मंगळवारी दिवसा उन्हाचा ताप दिल्यानंतर रात्री अवकाळीच्या वादळाने जिल्ह्यात काही ठिकाणी कहर केला. भिवापूर तालुक्यातील नांद (सुकळी) या गावी शिवारात विज पडल्याने गाेठ्याला आग लागल्याने पाच बैल आणि वासरू जळून खाक झाले. याच तालुक्यात वादळामुळे आंब्याच्या बागाही झडल्या. दरम्यान शहरातही मध्यरात्रीच्या वादळामुळे झाडांच्या फांद्या व बॅनर उन्मळून पडल्याची माहिती आहे.

मध्यरात्रीच्या सूमारास अचानक वादळाचा तडाखा व विजांचे गर्जन सुरू झाले. यामुळे विद्युतही खंडित झाली. यातच प्रचंड गर्जनासह विज या गाेठ्यावर काेसळली आणि गाेठ्याला आग लागली. गाेठ्यातील वैरण आणि इतर साहित्यानी पेट घेतला. अशात गाेठ्याची छत बैलांच्या अंगावर पडली व या आगीत पाच बैल व वासराचा जागीच हाेरपळून मृत्यू झाला. हा गाेठा बंदिस्त असल्याने जनावरांना बाहेर पळता आले नसल्याचे बाेलले जात आहे. एक बैल व गाय बाहेर पडले पण तेही हाेरपळले असून त्यांच्यावर स्थानिक पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार केले जात असल्याची माहिती आहे. तहसीलदार, नायब तहसीलदारासह सरपंच यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

वादळामुळे आंब्याची बाग झळली

याच तालुक्यात भगवानपूर परिसरात झालेल्या वादळामुळे आंब्याच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्री १२ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. झाडांवरील आंबे मोठ्या प्रमाणात गळून पडले. भगवानपूरला डॉ. नामदेव राऊत यांची सहा एकरांत आंब्यांची बाग आहे. तसेच बांधावरसुद्धा शेतकऱ्यांनी आंबालागवड केली आहे. त्यांचेही वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पारा ४२ अंशावरढगांच्या गर्दीने अवकाळीचे वातावरण असतानाही पाऱ्याने बुधवारी उसळी घेतली. आदल्या दिवशी ४१.२ अंशावर असलेले नागपूरचे तापमान बुधवारी ४२ अंशावर पाेहचले. मात्र ढगाळ वातावरणामुळे उन्हाचे तीव्र चटके जाणवत नसले तरी उकाड्याने नागरिकांना त्रस्त केले आहे. या सिजनमधले हे सर्वाधिक तापमान ठरले आहे. विदर्भातही बहुतेक जिल्ह्यात दिवसाचा पारा ४२ अंशावर आहे. ब्रम्हपुरीत तब्बल ४३.८ अंशाची नाेंद झाली, जी राज्यात सर्वाधिक आहे.

टॅग्स :nagpurनागपूर