शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

नागपुरातील आपली बसचे पाच वाहक बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:57 AM

शहरात धावणाऱ्या २०६ बसची शुक्र वारी अकस्मात करण्यात आलेल्या तपासणीत महापालिका अधिकाऱ्यांना पाच बस वाहकांनी पैसे घेऊनही प्रवाशांना तिकीट न दिल्याचे उघडकीस आले. या पाचही वाहकांना तात्काळ बडतर्फ करण्यात आले. प्रथमच पालिका अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे अचानक तपासणी मोहीम राबिवली. परिणामी दिवसभर बसमधील वाहकांनी प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट दिले. यामुळे नक्कीच उत्पन्नात भर पडेल, असा दावा परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी केला आहे.

ठळक मुद्देमनपाची अचानक बस तपासणी मोहीम : सात बसमध्ये आढळले विनातिकीट प्रवासी 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात धावणाऱ्या २०६ बसची शुक्र वारी अकस्मात करण्यात आलेल्या तपासणीत महापालिका अधिकाऱ्यांना पाच बस वाहकांनी पैसे घेऊनही प्रवाशांना तिकीट न दिल्याचे उघडकीस आले. या पाचही वाहकांना तात्काळ बडतर्फ करण्यात आले. प्रथमच पालिका अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे अचानक तपासणी मोहीम राबिवली. परिणामी दिवसभर बसमधील वाहकांनी प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट दिले. यामुळे नक्कीच उत्पन्नात भर पडेल, असा दावा परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी केला आहे.बस तपासी मोहिमेत महापालिकेतील प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, अनिरुद्ध चौगंजकर, राजेश भूतकर, एम. जी. कुकरेजा, मनोज गणवीर, राजेंद्र राहाटे, आर.एस. भुते, स्थावर अधिकारी अमिन अख्तर, प्रभारी कार्यकारी अभियंता अनिल नागदिवे, आसाराम बोदेले, अनिल कडू या अधिकाऱ्यांनी भाग घेतला. सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान २०६ बसची अचानक तपासणी केली असता विनातिकीट प्रवासी आढळून आलेल्या सात वाहकांवर कारवाई करण्यात आली. तर पाच बसमधील वाहकांनी प्रवाशांचे पैसे घेतले; परंतु त्यांना तिकीट दिले नाही. दोघांनी तपासणीत सहकार्य केले नाही, असे कुकडे सांगितले.परिवहन विभागाचा महसूल वाढविण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. वर्धा रोड, हिंगणा रोड, छिंदवाडा रोड, मानेवाडा-बेसा रोड, नंदनवन-पारडी, सोनेगाव, जयताळा, नारा, नारी, इंदोरासह अनेक मार्गांवरील बसवर अचानक तपासणी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.तिकिटातील गैरप्रकाराला आळा बसला तर दररोज दीड लाख उत्पन्नाची भर पडेल, असा दावा कुकडे यांनी केला. यावेळी उपसभापती प्रवीण भिसीकर, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाsuspensionनिलंबन