शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पाच कोटींच्या ठगबाजीचे प्रकरण : सतीश उके यांच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 12:28 AM

मौजा बाभूळखेडा येथील पाच कोटी रुपये किमतीची १.५ एकर जमीन हडपल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी आरोपी अ‍ॅड. सतीश महादेवराव उके यांना मुख्य न्यायदंडाधिकारी साळगांवकर यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा सोमवारपर्यंत पोलीस कोठडी रिमांड वाढवून घेतला.

ठळक मुद्देसोमवारपर्यंत पोलीस कोठडी : जुन्या गुन्ह्यांचा तपशील न्यायालयात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मौजा बाभूळखेडा येथील पाच कोटी रुपये किमतीची १.५ एकर जमीन हडपल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी आरोपी अ‍ॅड. सतीश महादेवराव उके यांना मुख्य न्यायदंडाधिकारी साळगांवकर यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा सोमवारपर्यंत पोलीस कोठडी रिमांड वाढवून घेतला.पोलीस लाईन टाकळी राठोड लॉनजवळील रहिवासी शोभाराणी राजेंद्र नलोडे (६०) यांच्या तक्रारीवरून ३१ जुलै २०१८ रोजी सतीश उके, चंद्रशेखर नामदेवराव मते आणि इतरांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४२३, ४२४, ४४७, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४ कलमान्वये अजनी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून उके यांना अटक करण्यात आली होती. त्यांचा ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आला होता. पोलीस कोठडी रिमांडची मुदत संपल्याने शनिवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.तपास अधिकारी पोलीस निरीक्षक ल.श. वर्टीकर यांनी उके यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात दाखल ठगबाजीच्या गुन्ह्यांचा गोषवारा दाखल केला. हा आरोपी संपत्ती हडपण्याचे गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे. स्वत: वकील असल्याने त्यांना कायद्याची पळवाट माहीत आहे. तपास कामात आरोपी मदत करीत नसल्याने आणि आरोपीचे गुन्ह्यात सहभागी साथीदार अटक करणे आवश्यक असल्याने पोलीस कोठडी रिमांड वाढवून देण्यात यावा, अशी मागणी सरकार पक्षातर्फे करण्यात आली.आरोपीच्या वकिलांकडून वाढीव पोलीस कोठडीस विरोध करण्यात आला. पोलिसांनी गुन्ह्यांचा जो गोषवारा सादर केला, त्यातील बऱ्याच गुन्ह्यात आरोपी दोषमुक्त झालेला आहे, असेही आरोपीच्या वकिलाकडून सांगण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली.न्यायालयात सरकारच्या वतीने सरकारी वकील रत्ना घाटे, आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सुदीप जयस्वाल, अ‍ॅड. शशिभूषण वाहणे यांनी काम पाहिले.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीadvocateवकिल