लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रकमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या दाेघांनी शनिवारी (दि. ११) अटक केली. त्यांच्याकडून एक काेटी दहा लाख रुपये किमतीचा गांजा, ट्रक व इतर साहित्य जप्त केले. या दाेन्ही आराेपींना न्यायालयाने पाच दिवसांची पाेलीस काेठडी (पीसीआर) सुनावली आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा पाेलीस उपनिरीक्षक आशिष माेरखडे यांनी दिली.
राेहित लखन जयस्वाल (वय २५, रा. कठरा, ता. गुन्नूर, जिल्हा पना) व साेनू कवरसिंग चव्हाण (३१, रा. देवसर, जिल्हा भिवानी) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. हे दाेघेही आरजे-२७/जीए-८८०४ क्रमांकाच्या ट्रकमधून १,१०४ किलाे गांजा घेऊन हिंगणघाटहून बुटीबाेरीकडे येत हाेते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा ट्रक बुटीबाेरी परिसरात थांबवून झडती घेतली. त्या ट्रकमधील काेकाे बिन्स (काॅफी बिया)च्या पाेत्यांमध्ये गांजाची पाेती लपवून वाहतूक केली जात असल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पाेलिसांनी त्या दाेघांना अटक केली आणि त्यांच्याकडून एक काेटी दहा लाख रुपयांचा गांजा, २० लाख रुपयांचा ट्रक, १० हजार रुपयांचा माेबाईल फाेन व इतर साहित्य असा एकूण एक काेटी ३० लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील आराेपी ट्रकचालक व क्लिनर आहेत. या दाेन्ही आराेपींना रविवारी (दि. १२) दुपारी नागपूर येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले हाेते. न्यायालयाने त्या दाेघांनाही पाच दिवसांची अर्थात गुरुवार (दि. १६)पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा पाेलीस उपनिरीक्षक आशिष माेरखडे यांनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार, सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.