लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवार, १८ जूनला पाच विमानांचे उड्डाण तर पाचे विमाने उतरणार आहेत. यामध्ये इंडिगोची चार विमाने आणि एअर इंडियाच्या एका विमानाचा समावेश आहे.प्राप्त माहितीनुसार, इंडिगोचे ६ई-२९७ नागपूर-मुंबई विमान सकाळी ११.३० वाजता उड्डाण भरणार असून, मुंबईला दुपारी १ वाजता पोहोचेल. याशिवाय ६ई-६१०४ नागपूर-पुणे सकाळी ११.५५ वाजता रवाना होऊन दुपारी १.०५ वाजता पोहोचेल, एअर इंडियाचे एआय- ४७० नागपूर-दिल्ली विमान सकाळी ९.४५ वाजता रवाना होऊन सकाळी ११.३० वाजता पोहोचणार आहे. याशिवाय इंडिगोचे ६ई-१३४ नागपूर-दिल्ली विमान दुपारी ४ वाजता रवाना होऊन ५.४५ वाजता दिल्लीला जाईल, तर ६ई-४०३ नागपूर-कोलकाता विमान रात्री ८.०५ वाजता निघून ९.५५ वाजता कोलकाताला पोहोचणार आहे.याशिवाय परतीच्या प्रवासात ६ई-५३२५ मुंबई-नागपूर विमान सकाळी ९.१५ वाजता निघून १०.४० वाजता नागपुरात, ६ई-६२७९ पुणे-नागपूर विमान दुपारी २ वाजता रवाना होऊन नागपुरात ३.१५ वाजता येईल. तसेच एअर इंडियाचे दिल्ली-नागपूर एआय-४६९ विमान सकाळी ६.३० वाजता उड्डाण भरून ८.१० वाजता नागपुरात, ६ई-१३५ दिल्ली-नागपूर सकाळी १० वाजता दिल्लीहून निघून नागपुरात ११.०५ वाजता आणि ६ई-४०४ कोलकाता-नागपूर विमान कोलकाताहून सायंकाळी ५.३५ वाजता निघून नागपुरात ७.२५ वाजता पोहोचणार आहे.
आज नागपुरातून पाच विमानांचे उड्डाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 1:48 AM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवार, १८ जूनला पाच विमानांचे उड्डाण तर पाचे विमाने उतरणार आहेत. यामध्ये इंडिगोची चार विमाने आणि एअर इंडियाच्या एका विमानाचा समावेश आहे.
ठळक मुद्देचार इंडिगो व एअर इंडियाचे एक विमान