लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतापनगर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार (एएसआय) भगवान शेजूळ यांनी पाच लाख रुपयची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एसीबीने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) प्रतापनगर पोलीस ठाण्यात लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एसीबीच्या ट्रॅपची माहिती होताच शेजुळ फरार झाला. अनेक दिवसानंतर एसीबीने पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.तक्रारकर्ता कंत्राटदार आहे. त्याच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास एएसआय शेजुळकडे होता. तक्रारकर्त्यानुसार शेजुळने फसवणुकीचा गुन्हा कलम ४२० दाखल न करता एन.सी. दाखल केली. तसेच प्रकरण मिटविण्यासाठी पाच लाखाची मागणी केली. पैसै न दिल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने शेजुळल रंगेहात पकडण्याची योजना तयार केली. ठेकेदाराने शेजुळसोबत चर्चा केली. शेजुळने पाच लाखाची रक्कम एकाचवेळी घेण्याऐवजी थोडी-थोडी देण्यास सांगितले. पहिली किस्त म्हणून दीड लाख रुपये मागितले. शेजुळने सांगितल्यानुसार १४ सप्टेंबर रोजी कंत्राटदार पैसे घेऊन ठरलल्या ठिकाणी पोहोचला. त्याने शेजुळला पैसे देण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान शेजुळला एसीबीच्या ‘ट्रॅप’ची माहिती मिळाली. त्याने पैसे घेण्यास नकार दिला. यानंतर दोन-तीन वेळा कंत्राटदाराने शेजुळशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो टाळाटाळ करीत होता. यानंतर बुधवारी एसीबीने प्रतापनगर पोलीस ठाण्यात शेजुळच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध (संशोधन) अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा दाखल केला. एसीबीने गल्या ८ महिन्यांपासून शहर पोलिसात कारवाई केली नव्हती. शेजुळच्या ट्रॅपमुळे पोलीस विभागातील वातावरण तापले आहे.ही कारवाई एसीबी अधीक्षक पी.आर. पाटील, अपर अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक शंकर शेळके, निरीक्षक विनोद आडे, जयपाल सिंह, कर्मचारी प्रभाकर बले, गजानन गाडगे, मनोज करणकर, रविकांत डहाट, शंकर कांबळे, मंगेश काळे, सरोज बुध आणि परसराम शाही यांनी केली.
नागपुरात सहायक फौजदाराने मागितली पाच लाखाची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:27 PM
प्रतापनगर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार (एएसआय) भगवान शेजूळ यांनी पाच लाख रुपयची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एसीबीने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) प्रतापनगर पोलीस ठाण्यात लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एसीबीच्या ट्रॅपची माहिती होताच शेजुळ फरार झाला. अनेक दिवसानंतर एसीबीने पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देएसीबीची कारवाई : प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल