लोकमत न्यूच नेटवर्कनागपूर : शहर बसची जबाबदारी वंश निमय यांच्याकडे असताना शहरात २०० बस धावत असताना दररोज २० ते २५ लाखाचे उत्पन्न होत होते. आता शहरात ३३७ बस धावत असूनही तिकीटातून दररोज १८ ते २२ लाखांचे उत्पन्न होत आहे. तिकीट चोरीसाठी आपली बसच्या कंडक्टर व चालकांनी मोबाईलवर व्हॉट्सअॅप ‘कंडक्टर सेटअप ग्रुप’ बनविला आहे. या माध्यमातून आपली बसच्या तिकीट चेकर्सच्या लोकेशनची माहिती एकमेकांना देऊन तिकीट चोरी केली जाते. यामुळे महापालिकेला दररोज ४ ते ५ लाखांचा फटका बसत आहे.बस कर्मचाऱ्यांनी अवैध व्हॉटस्अॅप ग्रुप सुरू केले आहेत. या माध्यमातून तिकीट चोरी केली जाते. चोरी प्रकरणात सापडलेल्या सात कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. यापुढे तिकीट चोरी प्रकरणात कंडक्टरचा सहभाग आढळून आल्यास त्यांना नोकरीतून बडतर्फ क रण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी दिली. तोटा कमी करण्यासाठी तिकिटांचा गैरव्यवहार रोखणे आवश्यक आहे. यासाठी चेकर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु चेकर्सलाही धमक्या येतात. त्यांना मारहाण केली जाते. अशा कंडक्टर व चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.डीम्स कंपनीने भरारी पथक तयार केले आहेत. या पथकांच्या माध्यमातून आपली बसची तपासणी केली जाते. परंतु या कामात कंडक्टर व चालकांकडून सहकार्य मिळत नाही. गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांकडून या कारवाईला विरोध केला जातो. प्रवाशांनी कंडक्टरला पैसे दिल्यानंतर तिकीट मागावे, तिकीट देण्यास नकार दिल्यास मनपाच्या परिवहन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन बाल्या बोरकर यांनी केले आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वीही अवैध व्हॉटस्अॅप ग्रुप आढळून आला होता. दोषीवर क ठोर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु प्रकरण दडपण्यात आले होते. यासंदर्भात विचारणा करता त्यावेळी मी पदावर नव्हतो, असे बोरकर म्हणाले.
तिकीट चोरीमुळे मनपाला दररोज पाच लाखांचा फटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 9:40 PM
चोरीसाठी आपली बसच्या कंडक्टर व चालकांनी मोबाईलवर व्हॉट्सअॅप ‘कंडक्टर सेटअप ग्रुप’ बनविला आहे. या माध्यमातून आपली बसच्या तिकीट चेकर्सच्या लोकेशनची माहिती एकमेकांना देऊन तिकीट चोरी केली जाते. यामुळे महापालिकेला दररोज ४ ते ५ लाखांचा फटका बसत आहे.
ठळक मुद्दे‘कंडक्टर सेटअप ग्रुप’सक्रिय : आठवडाभरात आठ कंडक्टर निलंबित