शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

नागपूर महामेट्रो प्रकल्पाच्या फेसबुक पेजला पाच लाख नागरिकांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:24 AM

महामेट्रो नागपूर प्रकल्पाच्या फेसबुक पेजला पाच लाख नागरिकांची पसंती मिळाली असून हा पल्ला केवळ चार वर्षांत गाठला आहे. देशाच्या इतर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या तुलनेत हा प्रकल्प अग्रेसर आहे.

ठळक मुद्देपाच हजार मेट्रोमित्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रो नागपूर प्रकल्पाच्या फेसबुक पेजला पाच लाख नागरिकांची पसंती मिळाली असून हा पल्ला केवळ चार वर्षांत गाठला आहे. देशाच्या इतर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या तुलनेत हा प्रकल्प अग्रेसर आहे.वर्धा मार्गावर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू असून हिंगणा मार्गावरही लवकरच सुरू होणार आहे. मेट्रोच्या बांधकामाची अद्ययावत माहिती तपासणे, प्रवासी वाहतूक सेवेची माहिती मिळविणे, शंकांचे निरसन करून घेणे हा दैनंदिन कार्याचा भाग आहे. प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळत मेट्रोच्या फेसबुक पानाला ५ लाख लाईक्स मिळाले असून पहिल्या क्रमांकाचे फेसबुक पान ठरले आहे. नागरिकांच्या फायद्याची माहिती ‘फेसबुक लाईव्ह’ स्वरूपात व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रृजेश दीक्षित यांच्यातर्फे व्हिडिओ स्वरुपात पोहोचविली जाते.भारतीय परंपरेत गणेशोत्सव, पहिल्यांदाच मेट्रोचे डबे नागपुरात पोहचल्याची पोचपावती, नागपूर मेट्रोचा उद्घाटन सोहळा व नागपूर मेट्रो पहिल्यांदाच वर्धा मार्गावर धावणारा प्रसंग, असे आनंदाचे प्रसंग फेसबुक लाईव्ह करण्यात आले. याशिवाय प्रवासी मेट्रो सेवा, बांधकाम स्थळावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या कॅमेऱ्याने टिपलेले छायाचित्र प्रकाशित करणे किंवा विविध स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना जुळवून ठेवण्याचे काम हे फेसबुक पेज करीत आहे. त्या आधारे महामेट्रोच्या पारदर्शक कामाची प्रचिती नागरिकांना येते. त्यामुळेच मेट्रो चमूसोबत सामाजिक कार्य करण्याची नागरिकांची रुची वाढत आहे. या माध्यमातून ५ लाखाांपेक्षा जास्त मेट्रोमित्र तयार झाले आहेत.नागपूर फेसबुक पेजला पाच लाख नागरिकांची पसंती मिळाल्याचा उत्सव ४ जुलैला मेट्रो मित्रांसोबत डॉ. दीक्षित आणि चमूने साजरा केला. दीक्षित यांनी यशाचे श्रेय नागपूरकरांना दिले. यावेळी संचालक (वित्त) एस. शिवमाथन, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे उपस्थित होते.

 

टॅग्स :Metroमेट्रोFacebookफेसबुक