लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बऱ्याच कालावधीनंतर अखेर महाराष्ट्रात रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. मध्य रेल्वेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) आणि नागपूर, पुणे, गोंदिया, सोलापूर दरम्यान ९ ऑक्टोबरपासून पुढील सुचनेपर्यंत पाच जोडी आरक्षित रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्या मते ०२१८९ दुरांतो स्पेशल रेल्वेगाडी ‘सीएसटीएम’वरून १० ऑक्टोबरपासून पुढील सुचनेपर्यंत धावणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी नागपूरला पोहोचेल. ०२१९० दुरांतो स्पेशल ही गाडी ९ ऑक्टोबरपासून नागपूरवरून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ‘सीएसटीएम’ला पोहोचेल. इगतपुरी सोडून या गाडीच्या वेळेत आणि थांब्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. ०२१०५ ‘सीएसटीएम’-गोंदिया विशेष रेल्वेगाडी ९ ऑक्टोबरपासून ‘सीएसटीएम’वरून सुटून दुसऱ्या दिवशी गोंदियाला पोहोचेल. ०२१०६ सुपरफास्ट स्पेशल रेल्वेगाडी १० ऑक्टोबरपासून गोंदियावरून सुटून दुसऱ्या दिवशी ‘सीएसटीएम’ला पोहोचेल. ईगतपुरी सोडून या रेल्वेच्या वेळेत आणि थांब्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
मुंबई-पुणे सुपरफास्ट स्पेशल रेल्वेगाडी ९ ऑक्टोबरपासून ‘सीएसटीएम’वरून सुटून त्याच दिवशी पुण्याला पोहोचेल. ०२१२४ सुपरफास्ट रेल्वेगाडी १० ऑक्टोबरपासून पुण्यारून सुटून त्याच दिवशी ‘सीएसटीएम’ला पोहोचेल. या गाडीची वेळ आणि थांबे पुर्वी सारखेच राहतील. ०२०१५ ‘सीएसटीएम’-पुणे सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी ९ ऑक्टोबरपासून ‘सीएसटीएम’वरून सुटून त्याच दिवशी पुण्याला पोहोचेल. ०२०१६ सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी ९ ऑक्टोबरपासून पुण्यावरून सुटून त्याच दिवशी ‘सीएसटीएम’टर्मिनसला पोहोचेल. या गाडीची वेळ आणि थांबे पुर्वीसारखेच राहणार आहेत.
०२११५ ‘सीएसटीएम’-सोलापूर सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी ९ ऑक्टोबरपासून ‘सीएसटीएम’वरून सुटून दुसऱ्या दिवशी सोलापूरला पोहोचेल. ०२११६ सोलापूर-‘सीएसटीएम’विशेष रेल्वेगाडी ९ ऑक्टोबरपासून सोलापूरवरून सुटून दुसऱ्या दिवशी ‘सीएसटीएम’ला पोहोचेल. कर्जत, खंडाळा, लोणावळा, मधा, मोहोल, भिगवान सोडून या गाडीची वेळ आणि थांब्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. या रेल्वेगाड्यांचे आरक्षण ८ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आले आहे.