शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

बसपाच्या दोन उमेदवारांसह पाच जणांची हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:20 PM

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत बसपाच्या पाच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यात नागपूर व सोलापूर येथील लोकसभेच्या उमेदवारासह दोन नगरसेवक आणि एका प्रदेश सचिवाचा समावेश आहे.

ठळक मुद्देपक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका : दोन नगरसेवक व एका प्रदेश सचिवाचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत बसपाच्या पाच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यात नागपूर व सोलापूर येथील लोकसभेच्या उमेदवारासह दोन नगरसेवक आणि एका प्रदेश सचिवाचा समावेश आहे.बसपाच्या प्रदेश कार्यालयीन सचिव असलेले उत्तम शेवडे यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. नागपूर लोकसभा मतदार संघातील बसपाचे उमेदवार मो. जमाल, सोलापूरचे उमेदवार राहुल सरोदे , प्रदेश सचिव नागोराव जयकर तसेच औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष व नगरेसवक महेंद्र सोनवणे, सोलापूरचे नगरसेवक आनंदा चंदनशिवे यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कार्य केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे. पक्षातील सूत्रानुसार लोकसभा निवडणुकीत बसपाची उमेदवारी मो. जमाल यांना मिळाल्यापासून पक्षात असंतोष पसरला होता. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा बसपाचे अनेक नगरसेवक व पदाधिकारी मो. जमाल आणि प्रदेश सचिव जयकर यांच्याविरुद्ध उघडपणे नाराजी व्यक्त करीत होते. या दोघांचे इतर राजकीय पक्षाशी संगनमत असल्याचे आरोपही अनेक पदाधिकारी करीत होते. अनेक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी या दोघांपासून फारकत घेतली होती. त्याचा परिणाम निवडणुकीतही बसपाला मिळालेल्या मतांवरून दिसून येतो. गेल्या निवडणुकीत ९६ हजारावर मते घेणाऱ्या बसपाच्या उमेदवाराला यंदा केवळ ३१,७२५ मते मिळाली. निवडणुकीनंतर पक्षातील ५० पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना एक निवेदन देत या दोघांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कुठलीही कारवाई झाली नाही. तेव्हा दोन दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत जाऊन प्रभारी अशोक सिद्धार्थ यांची भेट घेतली. त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगणयात आली. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी कारवाई केली.बसपाचे प्रदेश प्रभारी खा. अशोक सिद्धार्थ, प्रमोद रैना, प्रा. डॉ. ना.तू. खंदारे यांनी या पाचही जणांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पक्षाने म्हटले आहे.

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीnagpurनागपूर