शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

एकट्या शर्माने नेले पाच जणांना

By admin | Published: April 08, 2015 2:33 AM

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील पाच कच्च्या कैद्यांना दोन फेऱ्यांमध्ये एकट्या गणेश शर्मा याने आपल्या मोटरसायकलवर नेल्याची माहिती आहे.

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील पाच कच्च्या कैद्यांना दोन फेऱ्यांमध्ये एकट्या गणेश शर्मा याने आपल्या मोटरसायकलवर नेल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शर्माने या कैद्यांना मंगळवारच्या पहाटे नव्हे तर सोमवारच्या रात्री १ वाजताच्या सुमारास नेले, अशीही आश्चर्यकारक माहिती आहे. सर्वात आधी त्याने बिसनसिंग रामूलाल उईके आणि सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता यांना मोटरसायकलवर बसवून मोमीनपुऱ्याच्या बकरामंडीत सोडून दिले. त्यानंतर त्याने शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलिम खान, प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर रा. कुतबिशहानगर गिट्टीखदान यांनाही मोटरसायकलवरच बकरामंडीत सोडून दिले. गणेश शर्मा हा ठेंगणा व धष्टपुष्ट बांध्याचा आहे. त्यामुळे त्याला हे शक्य झाले. नवाब खान हा केवळ या कैद्यांना मोबाईल उपलब्ध करून देत होता. (प्रतिनिधी)दोन महिन्यापूर्वीच शिजला कटसूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार कैद्यांच्या पलायनाचा कट दोन महिन्यांपूर्वीच शिजला होता. संघटित गुन्हेगारांचे सिंडीकेट चालवणारा राजा गौसही पळून जाण्याच्या बेतात होता. परंतु त्याला एका पायाने साथच दिली नाही. पलायनात त्याच्या टोळीच्या बिसनसिंग उईके, सत्येंद्र गुप्ता आणि शिबूचा समावेश आहे. हे तिघेही मोक्काचे आरोपी आहेत. छिंदवाड्याच्या बसमधून प्रवासबकरामंडीत पाचही जण एकत्र झाल्यानंतर ते पिवळी नदी भागात गेले. या ठिकाणी एका कैद्याची बहीण राहते. त्याने तिच्याकडून पैसे घेतले आणि हे सर्व जण कोराडी मार्गवरील मानकापूर येथे गेले. मानकापूर पुलाच्या नंतर ते छिंदवाड्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसून रवाना झाले. सोमवारी पळून गेलेल्या या कैद्यांबाबतची पुसटशी माहिती मंगळवारी कैद्यांमार्फतच काही सुरक्षा रक्षकांना समजली. त्यांनी अधिकाऱ्यांना कळवले. बरॅक ६ मधील कैद्यांची मोजणी करण्यात आली तेव्हा पाच कैदी कमी आढळले. त्याबरोबरच संपूर्ण कारागृह प्रशासन हादरले.डेंटिस्ट कटर वापरलेपलायनाच्या आठवडाभरापासून या कैद्यांनी डेंटिस्ट उपयोगात आणत असलेल्या छोट्या कटरचा वापर केला. या कटरच्या साहाय्याने दातांचा आकार सारखा केला जातो. हे कटर मोबाईलच्या बॅटरीवर सुद्धा चालत असते. या कटरच्या सहाय्याने कैद्यांनी बडी गोलमधील बराक क्रमांक ६ च्या खिडकीचे तीन गज कापले होते. ब्लँकेट तुकड्याचा वापर सिग्नलसारखापळून जाण्याच्या दिवशी सोमवारी त्यांनी शर्मासोबत मोबाईलवर सतत संपर्क ठेवला होता. कोणत्या ठिकाणाहून पळून जायचे यासाठी त्यांनी ब्लँकेटच्या तुकड्याचा ‘सिग्नल’ म्हणून वापर केला. हा तुकडा उंच भिंतीवर फेकण्यात आला होता. हा भाग चुनाभट्टीकडील आहे. नेमका याच ठिकाणाहून शर्माने दोर फेकला. दोराच्या सहाय्याने हे कैदी एकेक करीत भिंत चढून पळण्यात यशस्वी ठरले.