लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : दराेडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच आराेपींना अटक करण्यात कामठी (नवीन) पाेलिसांना यश आले. विशेष म्हणजे, या पाचही आराेपींना पाेलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून शस्त्रे, मिरची पावडर व इतर साहित्य जप्त केल्याची माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली असून, ही कारवाई बुधवारी (दि. २) मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास कामठी-कळमना मार्गावर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये फैजल अन्सारी वकील अहमद (१९, रा. मोमिनपुरा, नागपूर), शाहरूख खान ऊर्फ मुन्ना आमिर खान (२२, रा. हंसापुरी, नागपूर), अनिल इंदल यादव (३५, रा. गवळीपुरा, कामठी), अनुराग ऊर्फ भुऱ्या बिसन भगत (३० रा. रामगड, कामठी) व यशवंत ऊर्फ आशू पवनसिंग ठाकूर (२०, रा. रमानगर, कामठी) या पाच जणांचा समावेश आहे. कामठी (नवीन) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना हे पाचही जण कामठी-कळमना मार्गावरील रिद्धी सिद्धी लेआऊट परिसरात संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे आढळून आले.
पाेलिसांना पाहताच त्यांनी पळ काढल्याच संशय बळावला व पाेलिसांनी लगेच त्यांचा पाठलाग सुरू केला. पाेलिसांनी त्या पाचही जणांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली, त्यात त्यांच्याकडे दराेडा टाकण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून येताच त्यांना अटक केली. या कारवाईमध्ये त्यांच्याकडून तलवार, माेठा चाकू, लोखंडी राॅड, मिरची पावडर, टाॅर्च व दाेरी आदी साहित्य जप्त केले. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ३९९, हत्यार प्रतिबंधक कायदा सहकलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई दुय्यम पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, प्रमोद वाघ, मनोहर राऊत, अनिल बाळराजे, नीलेश यादव, ललित शेंडे, सुरेंद्र शेंडे यांच्या पथकाने केली.
===Photopath===
030621\img-20210603-wa0109.jpg
===Caption===
दरोडेखोरांना अटक करण्याची कामगिरी बजावणारे नवीन कामती पोलीस ठाण्यातील पोलीस पथक