लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी/खापा : पारशिवनी पाेलिसांनी दहेगाव (जाेशी) तर खापा (ता. सावनेर) पाेलिसांनी काेच्छी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विनाराॅयल्टी वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर पकडले. यात सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ट्रॅक्टर व रेती असा एकूण २८ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पारशिवनी पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना गुरुवारी (दि. ४) सकाळी गस्तीवर असताना त्यांना दहेगाव (जाेशी) शिवारात एमएच-४०/बीएम-१६७५ (ट्राॅली क्रमांक-एमएच-४०/एम-२५५७) व एमएच-४०/बीजे-३५०५ (विना क्रमांकाची ट्राॅली) क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीमध्ये रेती असल्याचे आढळून आले. ती रेतीची विनाराॅयल्टी वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिसांनी प्रमाेद ऊर्फ मुकेश माेरेश्वर बाेरकर (३३), चंदू ईश्वर हले (३५) व आशिष लक्ष्मण सुरकार (२०) तिघेही रा. दहेगाव (जाेशी) यांना अटक केली. त्यांच्याकडून १३ लाख रुपये किमतीचे दाेन ट्रॅक्टर व सहा हजार रुपयांची रेती असा एकूण १३ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
खापा पाेलिसांनी गुरुवारी सायंकाळी काेच्छी (ता. सावनेर) शिवाराची पाहणी केली. यात त्यांना एमएच-४०/एएम-३५० (विना क्रमांकाची ट्राॅली), एमएच-४०/एल-७०७४ (विना क्रमांकाची ट्राॅली) व एका विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर (ट्राॅली क्रमांक एमएच-४०/ए-५२१)च्या ट्राॅलीमध्ये रेती आढळून आली. ती रेतीची विनाराॅयल्टी वाहतूक असून, कन्हान नदीतील असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिसांनी अशाेक नेमचंद वाघमारे (४३), मेघलाल फुलचंद वरखडे (३१) दाेघेही रा.काेच्छी, ता. सावनेर व भाऊराव शेषराव शालू (२२, रा. बावनगाव, ता. सावनेर) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १५ लाख रुपयांचे तीन ट्रॅक्टर आणि सहा हजार रुपयांची दाेन ब्रास रेती असा एकूण १५ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या दाेन्ही प्रकरणांमध्ये पारशिवनी व खापा पाेलिसांनी भादंवि ३७९, १०९, ५११, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. या घटनांचा तपास अनुक्रमे पाेलीस उपनिरीक्षक संदीपान उबाळे व सहायक पाेलीस निरीक्षक अजय मानकर करीत आहेत.