शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

नागपूरच्या कळमन्यातील पाच अनधिकृत कोल्ड स्टोरेजेसवर जोरदार प्रहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:40 PM

कळमना येथील विदर्भ कोल्ड स्टोरेज, वाधवानी कोल्ड स्टोरेज, वाधवानी परमेश्वरी कोल्ड स्टोरेज, कुणाल कोल्ड स्टोरेज, सुरुची कोल्ड स्टोरेज व वाधवानी कोल्ड स्टोरेज अ‍ॅन्ड आईस प्लॅन्ट यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी जोरदार प्रहार केला. न्यायालयाने या सर्व कोल्ड स्टोरेजेसना अनधिकृत ठरवून त्यांच्यावर दोन महिन्यात कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास व अन्य संबंधित प्राधिकरणांना दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : कायद्यानुसार कारवाई करण्याचा मनपा, नासुप्रला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना येथील विदर्भ कोल्ड स्टोरेज, वाधवानी कोल्ड स्टोरेज, वाधवानी परमेश्वरी कोल्ड स्टोरेज, कुणाल कोल्ड स्टोरेज, सुरुची कोल्ड स्टोरेज व वाधवानी कोल्ड स्टोरेज अ‍ॅन्ड आईस प्लॅन्ट यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी जोरदार प्रहार केला. न्यायालयाने या सर्व कोल्ड स्टोरेजेसना अनधिकृत ठरवून त्यांच्यावर दोन महिन्यात कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास व अन्य संबंधित प्राधिकरणांना दिला.या कोल्ड स्टोरेजेसनी महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यासच्या कारवाईविरुद्ध याचिका दाखल केल्या होत्या. त्यांच्या सर्व याचिका खारीज करण्यात आल्या. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी हा निर्णय दिला. त्यासोबत कोल्ड स्टोरेजसना दणका देणारे विविध आदेशही जारी करण्यात आले. ३० जुलै रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.कळमना येथील नासुप्रची जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला लीजवर देण्यात आली आहे. समितीने २०१२ मध्ये त्या जमिनीवर हे कोल्ड स्टोरेजेस उभारण्याची परवानगी दिली. त्यानंतर विविध नियमांची पायमल्ली करून पाचही कोल्ड स्टोरेज उभारण्यात आले. न्यायालयाने या कोल्ड स्टोरेजेसना अवैध ठरवले आहे. २०१२ पासून आतापर्यंत या कोल्ड स्टोरेजेसनी अनधिकृतपणे व्यवसाय करून मोठी कमाई केली आहे. ती कमाई सार्वजनिक उपयोगासाठी सरकारच्या तिजोरीत जमा होणे आवश्यक आहे. त्यामुळे आयकर आयुक्तांनी आयकर व सेल्स टॅक्स रिटर्नच्या आधारावर तीन महिन्यामध्ये कोल्ड स्टोरेजेसच्या उत्पन्नाचा अहवाल तयार करून तो न्यायालयात सादर करावा. त्यासाठी जीएसटी विभागाने आवश्यक सहकार्य करावे. अहवाल तयार करण्यापूर्वी कोल्ड स्टोरेजेसचे म्हणणे ऐकून घेण्यात यावे. त्याकरिता कोल्ड स्टोरेजेसनी १९ आॅक्टोबर २०१८ रोजी आयकर आयुक्तांपुढे हजर व्हावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अनिल आग्रे यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. ती याचिका न्यायालयाने कायम ठेवून त्यावर ७ जानेवारी २०१९ रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. जनहित याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. चेतन शर्मा व अ‍ॅड. पी. एस. तिवारी, सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी, मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट, नासुप्रतर्फे अ‍ॅड. मुकेश समर्थ तर, कोल्ड स्टोरेजेसतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी व इतरांनी कामकाज पाहिले.प्रत्येकी २० लाख जमा कराउच्च न्यायालयाने पाचही कोल्ड स्टोरेजेसना तीन महिन्यात प्रत्येकी २० लाख रुपये व्यवस्थापक कार्यालयात जमा करण्याचे निर्देश दिलेत. या रकमेची पुढील आदेशापर्यंत राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेव करण्यात यावी. आयकर आयुक्तांनी कोल्ड स्टोरेजेसची आर्थिक जबाबदारी निश्चित केल्यानंतर त्यातून ही रक्कम वजा करण्यात यावी. कोल्ड स्टोरेजेसनी रक्कम जमा न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी ती रक्कम भूमी महसूल म्हणून वसूल करावी. तसेच, कोल्ड स्टोरेजेसनी त्यांच्या नावावरील कोणतीही मालमत्ता विकू नये असेही न्यायालयाने सांगितले.समितीच्या सचिवांची चौकशी कराकृषी उत्पन्न बाजार समितीने कोल्ड स्टोरेजेसना जमीन भाड्याने देण्यासाठी २०१२ मध्ये करार केला. त्यावेळी कार्यरत सचिव किंवा संबंधित अधिकाऱ्यांंविरुद्ध पणन संचालकांनी चौकशी करावी व चौकशीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत.निर्णयावर सशर्त स्थगितीकोल्ड स्टोरेजेस या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यामुळे त्यांनी निर्णयावर १२ आठवड्यांसाठी स्थगिती देण्याची विनंती केली होती. परंतु, उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता कोल्ड स्टोरेजेसनी व्यवस्थापक कार्यालयात प्रत्येकी १० लाख जमा करण्याच्या अटीवर हा निर्णय आठ आठवड्यासाठी स्थगित ठेवला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे