पिपळा (डाकबंगला) : येथील सहकारमहर्षी बाबासाहेब केदार वाचनालय येथे आशा सेविकांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी डॉ. सुनीता रेहपाडे, आशा सेविका प्रतिभा रामटेके, सोनू लांडगे, वर्षा वासनिक, ममता पाटील, सुनीता सावरकर, चंद्रकला बाेंद्रे, विनोद कुंभलकर, आशिष नागठाणे, चंद्रभान वडकी, योगेश पाटील, मंगेश कळंबे तसेच फिटनेस ग्रुपचे सदस्य व नागरिक उपस्थित होते. कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन सेवा देणाऱ्या आशा सेविकांना ध्वजाराेहणाचा मान देऊन त्यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
एसआरके इंडाे पब्लिक स्कूल, जलालखेडा
जलालखेडा : येथील एसआरके इंडो पब्लिक स्कूल व सरस्वती विद्यामंदिर येथे स्वातंत्र्य दिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतचे माजी सदस्य कुलदीप हिवरकर यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य शुभांगी अर्डक, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर अंतूरकर व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य सादर केले. शाळेच्या परिसरात वृक्षाराेपण करण्यात आले.
....
हुतात्मा स्मारक, माेवाड
माेवाड : येथील हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रशासकीय अधिकारी नितीन तापकीर यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. नगर परिषद उच्च माध्यमिक शाळा येथे मुख्याधापक ज्ञानेश्वर दारोकर, शिवाजी महाविद्यालय येथे डॉ. किशोर झिलपे, नगर परिषद कार्यालय येथे मुख्याधिकारी प्रवीण मानकर, यंग स्टार क्रीडा मंडळ येथे माजी नगराध्यक्ष पंजाब माळोदे, महात्मा फुले पतसंस्था येथे धनराज देवघरे, जुनी वस्ती येथे राजेश कुलवाल यांनी ध्वजाराेहण केले. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष सुरेश खसारे, अनिल साठोणे, ललित खंडेलवाल, रवी वैद्य, पांडुरंग वाघे, नामदेव वाडबुद्धे, ललिता अकर्ते, अफसर पठाण, हिराचंद कडू, रवी माळोदे, चेतन रोंगरे, यश चाळीसगावकर, दिनेश घावडे व नागारिक उपस्थित होते.
....
ऑरेंज सिटी काॅन्व्हेंट, नरखेड
नरखेड : येथील ऑरेंज सिटी काॅन्व्हेंट येथे संस्थेचे सदस्य संदेश शिंदे, सचिव पुष्पा शिंदे यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य शहाजद काजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमात दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जयश्री लुंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत ढोके यांनी केले. आभार अनुराधा काळे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित हाेते.