पारशिवनी : परिसरात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील गरंडा येथील जि. प. शाळेत शाळा समितीचे अध्यक्ष राष्ट्रपाल बाेंबले यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी सरपंच चक्रधर महाजन, ग्रा.पं. सदस्य राष्ट्रपाल मेश्राम, प्रफुल्ल धाेटे, मनिषा काेळे, माजी सरपंच चुडामण ठाकरे, पाेलीस पाटील संदीप मेश्राम, मुख्याध्यापिका नलिनी खडसे, शिक्षक खुशाल कापसे, अंगणवाडी सेविका संघमित्रा शेंडे तसेच गावकरी उपस्थित हाेते.
धामणा
धामणा : स्थानिक ग्रामपंचायत प्रांगणात प्रशासक दिलीप पाटील यांनी ध्वजाराेहण केले. पशुवैद्यकीय दवाखाना येथे सुनंदा सातपुते, उच्च प्राथमिक शाळा येथे तुळशीराम बेहरे, अंजनाबाई वानखेडे विद्यालय येथे माजी उपसरपंच तेजराव सरोदे, विद्यार्थी विकास विद्यालयात मुख्याध्यापिका रंजना भोयर, के.एम.टी. काॅन्व्हेंट स्कूल येथे संचालक प्रा. नंदेश तागडे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य अविनाश पारधी, डॉ. पवन भागवत, माजी सरपंच वर्षा भलावी, माजी उपसरपंच माया कडू, ग्रामसचिव सुनील जोशी, दिनकर टोंगे, माेतीराम सरोदे व सर्व शिक्षक उपस्थित होते. पेठ पोलीस चौकी येथे हेड काॅन्स्टेबल कमलाकर उईके यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी पाेलीस कर्मचारी विशाल तोडासे, आशिष पौनीकर तसेच राजू पारधी, सुनील कापसे, दिनेश वाईकर, राजू पवार, तुषार डवरे उपस्थित होते. सातनवरी ग्रामपंचायत येथे सरपंच विजय चौधरी यांनी तर शिरपूर भुयारी ग्रामपंचायत येथे सरपंच गाैरीशंकर गजभिये यांनी ध्वजाराेहण केले.
बुटीबाेरी
बुटीबोरी : परिसरात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगर परिषदेच्या प्रांगणात भारतमातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बबलू गाैतम यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, न. प. उपाध्यक्ष अविनाश गुर्जर, सभापती अरविंद जयस्वाल, विनोद लोहकरे, मंदार वानखेडे, नगरसेवक प्रवीण शर्मा, सनी चव्हाण, नगरसेविका संध्या आंबटकार, विद्या दुधे, रेखा चटप, अर्चना नगराळे, नंदा सोनवाणे, वीणा ठाकरे, मंगेश आंबटकर, देवा टेकाडे, तुकाराम हुसुकले, रामदास राऊत यांच्या न. प. कर्मचारी व नागरिक उपस्थित हाेते.