लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी चीनमध्ये तीन-तीन कोचेसच्या दोन मेट्रो रेल्वे तयार झाल्या आहेत. तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यापैकी एक रेल्वे गुरुवार, २२ नोव्हेंबरला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर चीनमध्ये हिरवी झेंडी दाखवून भारताकडे रवाना करणार आहे.चीनची सीआरआरसी कंपनीच्या डालियान प्रकल्पात निर्मित या मेट्रो रेल्वेला जहाज मार्गाने चेन्नई येथे आणण्यात येणार आहे. तेथून रस्ते मार्गाने ट्रेलरने नागपुरात येणार आहे. दिसण्यास आकर्षक मेट्रो रेल्वेमध्ये आधुनिक सुविधा आहेत. यामध्ये आकस्मिक रिक्तीकरण यंत्रणा, वाय-फाय सुविधा आणि लाईव्ह स्क्रीनचा समावेश आहे. भारतीय मेट्रो रेल्वेमध्ये पहिल्यांदा नागपूर मेट्रोच्या रेल्वेच्या १६ टन चेसिसला सहजरीत्या वहन करू शकते. कोचमधील इन्व्हर्टर आणि अन्य उपकरणांची निर्मिती जपानमध्ये केली आहे.सीआरआरसीच्या डालियान प्रकल्पात रेल्वेची विविध (स्थिर आणि गतिशील) तपासणी केली आहे. यामध्ये प्रत्येक रिक्त कोचच्या वजनाची तपासणी, वाहन स्टेटिक गेज टेस्ट अर्थात धावताना कोचचे विविध मानकांच्या आधारावर परीक्षण, वॉटर लिकेज टेस्ट, सिग्नल सिस्टम उभारणी चाचणी आदींचा समावेश आहे. या सर्व तपासण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर सहा कोचेसला (दोन मेट्रो रेल्वे) सीआरआरसी, चीनमधून नागपुरातील मिहान कार डेपोमध्ये आणण्यात येईल. त्यानंतर दुसरी रेल्वे चीनमधून नागपुरात पाठविण्यात येणार आहे. सीआरआरसी नागपूर मेट्रोकरिता एकूण ६९ कोचेस अर्थात २३ मेट्रो रेल्वेची निर्मिती करीत आहे. यापैकी दोन रेल्वे तयार झाल्या आहेत.
नागपूर मेट्रो रेल्वेला आज चीनमधून दाखविण्यात येणार हिरवी झेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:48 AM
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी चीनमध्ये तीन-तीन कोचेसच्या दोन मेट्रो रेल्वे तयार झाल्या आहेत. तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यापैकी एक रेल्वे गुरुवार, २२ नोव्हेंबरला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर चीनमध्ये हिरवी झेंडी दाखवून भारताकडे रवाना करणार आहे.
ठळक मुद्दे डिसेंबर अखेरीस पोहोचणार नागपुरात : एकूण २३ मेट्रो रेल्वेची निर्मिती