शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मेट्रो रेल्वेच्या दोन्ही बाजूंच्या फ्लॅटचे दर कमी होणार

By admin | Published: June 16, 2017 2:15 AM

राज्य सरकारने ९ जून रोजी अधिसूचना जारी करीत आॅटोमोटिव्ह चौक ते मिहानपर्यंत आणि प्रजापतीनगर ते लोकमान्य नगरपर्यंत

रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली शक्यता : वाढीव ‘एफएसआय’चा होणार फायदाआनंद शर्मा। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वे कॉरिडोरच्या दोन्ही बाजूला ५०० मीटरपर्यंत फ्लोअर स्पेस इंडेक्स (एफएसआय) २.९५ वरून ४ केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मेट्रो रेल्वे कॉरिडोरच्या दोन्ही बाजूला बनणाऱ्या अपार्टमेंटमधील फ्लॅट्सच्या किमती कमी होण्याची शक्यता रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली आहे. नागपुरातील बिल्डर्स-डेव्हलपर्सची संघटना ‘क्रेडाई नागपूर मेट्रो’चे अध्यक्ष अनिल नायर यांच्यानुसार शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या आणि वायुप्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने शहरात मेट्रो रेल्वे चालवण्यात येणार आहे. या उद्देशाच्या पूर्तीसाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊनच सरकारने मेट्रो रेल्वे कॉरिडोरच्या आजूबाजूचा एफएसआय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कॉरिडोरच्या दोन्ही बाजूची नागरी वस्ती वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरून लोक सहजपणे मेट्रो रेल्वेचा लाभ घेऊ शकतील. या साामजिक संदर्भाव्यतिरिक्त कॉरिडोरच्या आजूबाजूला एफएसआय वाढवण्याचा फायदा बिल्डर्स आणि त्यांच्याकडून संपत्ती खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सुद्धा होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मेट्रो रेल्वेच्या दोन्ही बाजूला बनणाऱ्या नवीन अपार्टमेंटमधील फ्लॅटच्या किमती कमी होतील, असे मानले जात आहे. देशातील इतर शहरांमध्ये एफएसआय वेगवेगळे असले तरी तिथे सुद्धा हाच पॅटर्न राबवण्यात आला असल्याचे नायर यांचे म्हणणे आहे. असे करण्यापूर्वी इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी केली जाते. याअंतर्गत एफएसआय वाढल्यानंतर संबंधित क्षेत्रात वाढणाऱ्या लोकसंख्येनुसार सिव्हरेज लाईन, स्टॉर्म वॉटर लाईनसह इतर सुविधा उपलब्ध आहेत की नाही, हे पाहून प्रीमियमच्या रकमेतून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिली जाते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारतर्फे मेट्रो कॉरिडोरमध्ये वाढलेल्या एफएसआयचा उपयोग करण्यासाठी प्रीमियम घेण्यात येत असेल तर कमाई करणे हा सरकारचा उद्देश नसल्याचे दिसून येते. सरकारच्या या निर्णयाचा लाभ कॉरिडोरच्या आजूबाजूला सध्या असलेल्या इमारतींना होणार नाही, असेही नायर यांचे म्हणणे आहे. त्यांना याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी आवश्यक साईड मार्जिन सोडावी, परंतु असे करणे त्यांच्यासाठी शक्य होणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. फायर एनओसीमध्ये सूट वरिष्ठ बिल्डर व युनिक असोसिएट्सचे संचालक आर.एस. सिंह यांचे म्हणणे आहे की, पूर्वी ग्राऊंड प्लस चार मजली इमारत बनविण्यासाठी फायर एनओसी घ्यावी लागत असे. परंतु आता नव्या अधिसूचनेनुसार तळ मजल्याला (पार्किंग एरिया) फायर एनओसीसाठी ग्राह्य मानले जाणार नाही. इमारतीच्या उंचीच्या दृष्टीने आता चार माळ्यापर्यंत एनओसी लागणार नाही. परंतु एव्हिएशन विभागाच्या मंजुरीसाठी पात्र इमारतीच्या उंचीकडे लक्ष द्यावे लागेल. सिंह यांच्यानुसार मोठ्या फ्लॅट स्कीमसाठी आता साईड मार्जिन कमी करण्यात आल्याने वाढलेल्या एफएसआयचा उपयोग करणे सोपे होईल. आता लहान मार्गासाठीसुद्धा एफएसआय वाढविल्याचा लाभ बिल्डरसोबतच सामान्यांनाही होईल.