नागपूर : संततधार पावसामुळे विदर्भातील अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण होऊन सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दोन जण पुरात वाहून गेले. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने गावांमध्ये पाणी शिरले. संसतधार पावसामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भामरागड, अहेरी, सिरोंचा तालुक्यात नदी-नाल्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन दिवसात दोघे पुरात वाहून गेले. भामरागडमध्ये पुराचे पाणी शिरल्याने ३०० कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले.भंडारा व गोंदिया जिल्ह्यांशिवाय शेजारील सीमावर्ती मध्य प्रदेशातही दमदार पाऊस असल्याने पुजारीटोलासह गोंदिया जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. परिणामी एकट्या भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठावरील ८२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.अमरावतीमधील धारणी तालुक्यात २४ तासात तब्बल १२५.१ मिमी पाऊस बरसला. नद्यांना पूर आला असून सुमारे ४० गावांचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टरील पिके पाण्याखाली आली आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली-कोंढाणा लगतच्या पुलावरून पाणी वाहत असताना काल बुधवारी सायंकाळच्या वेळी घरी परतणारी १५ जनावरे वाहून गेली. यवतमाळ जिल्ह्यांतही जोरदार पाऊस आहे.
विदर्भातही पूरस्थिती; गडचिरोलीत दोघे बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 2:41 AM