शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

लॉकडाऊनमध्ये फुले कोमेजली, ५ ते १० रुपये किलोने विकावा लागला माल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 11:16 AM

Nagpur News लॉकडाऊनचा फटका फूलउत्पादक शेतकऱ्यांना पहिल्याच दिवशी बसला. मार्केट बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मालच आणला नाही. ज्यांनी आणला, त्यांना ५ ते १० रुपये किलो दराने फुले विकावी लागली.

ठळक मुद्देअनेकांनी शेतातच फेकली फुले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लॉकडाऊनचा फटका फूलउत्पादक शेतकऱ्यांना पहिल्याच दिवशी बसला. मार्केट बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मालच आणला नाही. ज्यांनी आणला, त्यांना ५ ते १० रुपये किलो दराने फुले विकावी लागली. या परिस्थितीमुळे फुले कोमेजली अन्‌ शेतकऱ्यांचे चेहरेही !

गुलाब, लिली, शेवंती, कलर, डेझी ही फुले नागपूरच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येतात. जिल्ह्यातील फूलउत्पादक शेतकऱ्यांचा यात समावेश अधिक असतो. फुले नाशिवंत असल्याने तोड झाल्याबरोबर तात्काळ विक्रीला आणावी लागतात, अन्यथा मातीमोल होतात. यावेळी लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने मार्केटमध्ये आणण्यापूर्वीच ती मातीमोल झाली.

प्रशासनाने परवानगी नाकारल्याने सोमवारी सकाळी फुलांचा बाजार उघडलाच नाही. परिसरातील काही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी फुले आणली. मात्र, परस्पर विकून गावाकडे परतावे लागले. ५ ते १० रुपये किलोच्या दराने त्यांना माल विकावा लागला. नागपुरातील फुलांच्या बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांकडून दररोज सरासरी ६ ते १० लाख रुपयांची उलाढाल होते. सोमवारी मात्र १० हजार रुपयांच्या पुढे हा आकडा सरकला नाही. महात्मा फुले पुष्पउत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, इतर वेळी फुलांचा दर ६० ते १०० रुपये किलो असतो. मात्र, सोमवारी बाजारच न भरल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावाने ती विकावी लागली. माल फेकण्यापेक्षा मिळेल तो भाव त्यांनी घेतला.शेतकरी हतबल 

लॉकडाऊनमुळे फूलउत्पादक शेतकरी हतबल दिसले. हिंगणा तालुक्यातील वाघ (उमरी) येथील शेतकरी किशोर वाघ यांनी सोमवारी दुपारीच आपल्या दीड एकर शेतातील फुले तोडून फेकली. ते म्हणाले, भाव कमी असल्याने बाजारात न्यायला परवडत नाही. झाडावर तशीच ठेवली, तर झाड खंगते. त्यामुळे तोडाईचे नुकसान झेलून त्यांनी चक्क फुले शेतातच फेकली. वारंगा येथील शेतकरी राहुल थूल यांनी रविवारी फुले तोडून ठेवली होती. सकाळी मार्केटमध्ये आणल्यावर १० रुपये किलोने विकावी लागली. या गावातील सात ते आठ शेतकरी जय साईराम फुल उत्पादक बचत गट चालवितात. या सर्वांनाच फटका बसला.

पालकमंत्र्यांनी विनंती फेटाळली

महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनने पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी निवेदन देऊन फूल बाजार सकाळी ७ ते ९ या वेळेत उघडण्यास परवानगी मागितली होती. मात्र, ती पालकमंत्र्यांनी फेटाळली. सर्व मार्केट बंद असताना फुले कोण घेणार, असा प्रश्न विचारून त्यांनी या विनंतीला नकार दिला. त्यामुळे फुलांचा बाजार सोमवारी उघडलाच नाही.

...

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस