शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कोरोनाच्या रुग्णात चढउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:08 AM

नागपूर : कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या नियंत्रणात असलीतरी मागील चार-पाच दिवसांपासून पुन्हा चढउतार दिसून येत आहे. मंगळवारी १० पॉझिटिव्ह रुग्णांची ...

नागपूर : कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या नियंत्रणात असलीतरी मागील चार-पाच दिवसांपासून पुन्हा चढउतार दिसून येत आहे. मंगळवारी १० पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,९२,८५२ झाली. दोन दिवसांपासून मृत्यूची नोंद नसल्याने मृतांची संख्या १०,११६वर स्थिरावली आहे.

कोरोनाचा रुग्णसंख्येसोबतच त्याची भीतीही कमी होताना दिसून येत आहे. परिणामी, मास्क, सॅनिटायझेशन व फिजीकल डिस्टंन्सिगचा नियमाला बगल देण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा धोका होण्याची शक्यता, आहे. मंगळवारी शहरात ४,५८९ तर ग्रामीणमध्ये १,१६८ असे एकूण ५,७५७ चाचण्या झाल्या. यातून शहरात ६ तर ग्रामीणमध्ये ४ रुग्ण आढळून आले. आज २३ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाºया रुग्णांची संख्या ४,८२,५४१ झाली. सध्या १९५ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील १४४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ५१ रुग्ण शासकीयसह विविध खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

-मेडिकलमध्ये १४, एम्समध्ये ३ तर मेयोत २ रुग्ण

कोरोनाचा रुग्णांसाठी मेडिकलमध्ये ९००, मेयोत ६०० तर एम्समध्ये २५० बेडची सोय करण्यात आली होती. मार्च व एप्रिल महिन्यात या रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले होते. परंतु प्रादुर्भाव कमी होताच हेच बेड ‘नॉन कोविड’ रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. सध्या मेडिकलमध्ये १४, एम्समध्ये ३ तर मेयोत केवळ २ रुग्ण उपचाराखाली आहेत.

:: कोरोनाची गुरुवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ५,७५७

शहर : ६ रु ग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : ४ रुग्ण व ० मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,९२,८५२

ए. सक्रिय रुग्ण : १९५

ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,५४१

ए. मृत्यू : १०,११६