शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

मेट्रो रेल्वेच्या मार्गाजवळ पतंग उडविल्यास होऊ शकते दुर्घटना; संक्रातीला काळजी घ्या

By मोरेश्वर मानापुरे | Published: January 10, 2024 7:19 PM

पतंगप्रेमींनी काळजी घ्यावी

नागपूर : पतंग उडवण्याचा उत्सव म्हणजे जानेवारीचा महिना. यादरम्यान संपूर्ण आकाश पतंगमय झाले असते. पण पतंगीचा हा उत्सव साजरा करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. मेट्रो ट्रेनचे संचालन विद्युत प्रवाहाच्या माध्यमाने होतो. पतंग किवा मांजा या विद्युत तारांमध्ये अडकल्यास मोठी दुर्घटना घडू शकते तसेच ट्रेनचे संचालन होण्यास अडथळा निर्माण होऊ शकते. त्यामुळे पतंगप्रेमींनी पतंग उडविताना काळजी घ्यावी, असे आवाहन महामेट्रोने केले आहे.मेट्रो ट्रेनच्या संचालनात अडथळा निर्माण झाल्यास मेट्रो प्रवास लांबू शकतो. त्यामुळे युवक आणि नागरिकांनी मेट्रो रेल्वे मार्गाजवळ पतंग उडवू नये. शिवाय पतंग व मांजा अडकल्याने मेट्रो सेवा प्रभावित होणार नाही, याची काळजी घ्यावी. मेट्रो सेवा सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत दर १५ मिनिटांनी आणि गर्दीच्या वेळेत दर १० मिनिटांनी उपलब्ध आहे. महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ऑरेंज लाईन मेट्रो स्टेशन आणि पुढे मिहान डेपोपर्यंत तसेच अ‍ॅक्वा लाईन मार्गावर सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर आणि पुढे हिंगणा डेपोपर्यंत मेट्रो ट्रेनचे संचालन सुरू असते.

टॅग्स :nagpurनागपूरMetroमेट्रो