लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययाेजनांची अंमलबजावणी हाेणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले. साेबतच काेराेनाला राेखण्यासाठी नियम पाळावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
कामठी पंचायत समिती सभागृहात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी जि.प. सदस्य अवंतिका लेकुरवाळे यांनी लग्न, स्वागत समारंभ व इतर कार्यक्रमासाठी नागरिकांनी मंगल कार्यालये, लाॅन बुक केले. आता सर्व कार्यक्रम रद्द केले जात आहेत. अशा नागरिकांना मंगल कार्यालय, लाॅन संचालकांनी बुकिंग केलेले पैसे परत देण्यात यावे, या बाबीकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. काही खासगी डाॅक्टर नियमाचे उल्लंघन करीत काेराेना संकटकाळातही नागरिकांची पिळवणूक करीत असल्याच्या तक्रारी यावेळी समाेर आल्या. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी डाॅक्टर असाे वा कुणी व्यक्ती शासनाच्या नियमाचे उल्लंघन करीत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
तसेच बाजार परिसर व इतर ठिकाणी गर्दी हाेणार नाही, याची खबरदारी घेऊन, मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. या बैठकीला नगराध्यक्ष शहाजहाँ शफाअत, न.प. उपाध्यक्ष अफाज अहमद, उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, सहायक पाेलीस उपायुक्त राेशन पंडित, तहसीलदार अरविंद हिंगे, ठाणेदार विजय मालचे, संजय मेंढे, खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे, मुख्याधिकारी संदीप बाेरकर तसेच जि.प. विराेधी पक्षनेता अनिल निधान, जि.प. सदस्य अवंतिका लेकुरवाळे, माेहन माकडे, ज्ञानेश्वर कंभाले, पं.स. सभापती उमेश रडके, उपसभापती आशिष मलेवार, पं.स. सदस्य दिशा चनकापुरे, दिलीप वंजारी, वनिता जिचकार, पूनम माेहाेड, शालू हटवार, सुमेश रंगारी, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय माने, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक नयना दुपारे, डॉ. शबनम खानुनी, नायब तहसीलदार रणजित दुसावार, विस्तार अधिकारी अरविंद अंतुरकर आदींची उपस्थिती हाेती.