शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

सामाजिक अंतर पाळा, कोरोनाची साखळी खंडित करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:46 AM

एका रुग्णामुळे शहरात सुमारे १९९ जणांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवायचा असेल, ही साखळी खंडित करण्यासाठी सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ‘कोरोनाची साखळी कशी खंडित होणार?’ या विषयावर ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी मंगळवारी नागरिकांशी संवाद साधला आणि प्रश्नांना उत्तरे दिली.

ठळक मुद्देआयुक्त तुकाराम मुंढे यांचे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या जगभर कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे एक रुग्ण चारशे ते एक हजार लोकांना कोरोनाबाधित करू शकतो. कोरोना संसर्गाची साखळी खंडित करायची असेल तर यासाठी कोणत्याही दोन व्यक्तींनी एकत्र येण्यापासून रोखणे आवश्यक आहे. घरातही दोन व्यक्तींमध्ये किमान पाच फुटांचे अंतर राखणे गरजेचे आहे. नागपुरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येला अशाच संसर्गाची पार्श्वभूमी आहे. एका रुग्णामुळे शहरात सुमारे १९९ जणांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवायचा असेल, ही साखळी खंडित करण्यासाठी सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ‘कोरोनाची साखळी कशी खंडित होणार?’ या विषयावर ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी मंगळवारी नागरिकांशी संवाद साधला आणि प्रश्नांना उत्तरे दिली.कोविड-१९चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र अजूनही बहुतांशी लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाहीत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास कोरोनापासून बचावाचा उत्तम उपाय घरी राहणे हाच आहे. कोरोना संशयित आढळल्यानंतर त्यांना मनपाच्या विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी संशयिताच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांची संपूर्ण ‘हिस्ट्री’ शोधून त्यांनाही ‘क्वॉरंटाईन’ करणे का आवश्यक आहे, ही सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत त्यांनी दिली. यासह नागरिकांकडून विचारण्यात येणाºया प्रश्नांचेही त्यांनी सोप्या भाषेत समाधान केले....तर ५०० रुपये दंडभाजी विक्रेते असो अथवा सामान्य नागरिक घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे बंधनकारक आहे. शहरात कुणीही मास्कविना आढळल्यास त्याच्याकडून ५०० रुपये दंड वसूल करण्याचा विचार मनपा प्रशासन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.‘मॉर्निंग’ आणि ‘इव्हिनिंग वॉक’ करणाऱ्यांवर कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.बालकांच्या लसीकरणासंदर्भात नियंत्रण कक्षाशी संपर्क साधासध्या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आल्याने बालकांच्या लसीकरणासाठी काही सुविधा करण्यात आली आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, लॉकडाऊन असले तरी बालकांना विहीत कालावधीमध्येच लसीकरण व्हावे यासाठी मनपा तत्पर आहे. ज्या बालकांना लसीकरण द्यायचे असेल त्यांनी मनपाच्या नियंत्रण कक्षामध्ये ०७१२-२५६७०२१, २५५१८६६, २५६२४७४ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेFacebookफेसबुक