लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शनिवारी एका सुपारी व्यावसायिकाच्या वर्धमाननगर येथील ऑक्ट्रॉय फ्री झोन येथील गोदामावर धाड टाकून लाखो रुपये किमतीची सुपारी जप्त केल्याची माहिती आहे.प्राप्त माहितीनुसार, बेलतरोडी पोलिसांनी शुक्रवारी एक ट्रक सुपारी पकडली होती. पोलिसांच्या माहितीवरून एफडीएच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी सुपारी व्यापाऱ्याच्या ऑक्ट्रॉय फ्री झोन येथील गोदामावर धाड टाकली. धाडीदरम्यान सुपारीचे दोन ट्रक होते. सुपारी पोते गोदामात उतरविण्यात येत होते. पण एफडीएच्या अचानक कारवाईनंतर सुपारीच्या मालासह एक ट्रक रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई एफडीएचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वात आणि सहायक आयुक्त (अन्न) अभय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई गोदाम क्रमांक ११०-१ आणि १०९-१ वर करण्यात आली. धाडीदरम्यान ट्रक क्रमांक एमपी-०९, एमएच-०५९६ पकडण्यात आला. गोदामात चार ते पाच व्यापाऱ्यांची सुपारी असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. धाड दुपारी टाकण्यात आली असून कारवाई रात्रीपर्यंत सुरू होती.सुपारीची अवैध वाहतूक आणि विक्रीसाठी नागपूर मोठे केंद्र आहे. कोविड नियमांमध्ये सवलती दिल्यानंतर सुपारी व्यापारी सक्रिय झाले आहेत. दक्षिण भारताच्या विविध राज्यांसह विदेशातून सुपारी महसूल बुडवून नागपुरात मोठ्या प्रमाणात येत आहे. शनिवारी जप्त करण्यात आलेली सुपारी दक्षिण भारतातून आणण्यात आली होती. पण विदेशातून सुपारी मागविणारे आताही एफडीएच्या रडारबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासन विभागाची सुपारी व्यावसायिकावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:59 AM
अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शनिवारी एका सुपारी व्यावसायिकाच्या वर्धमाननगर येथील ऑक्ट्रॉय फ्री झोन येथील गोदामावर धाड टाकून लाखो रुपये किमतीची सुपारी जप्त केल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देलाखो रुपयांची सुपारी जप्त : ऑक्ट्रॉय फ्री झोनच्या गोदामावर धाड