लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सावनेर येथील पिंपळाफाटा येथे ३१ आॅगस्टपासून सुरू असलेल्या एनसीसी कॅम्पमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी रात्रीचे जेवण करताच, अनेकांना उलट्या आणि चक्कर येऊ लागली, यात गंभीर झालेल्या १० मुली आणि एका मुलाला बुधवारी रात्री ९.४५ वाजता इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते.प्राप्त माहितीनुसार, दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी सावनेर येथील पिंपळाफाटा येथे ‘प्री आरडी’कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ आॅगस्टपासून या कॅम्पला सुरुवात झाली. सुमारे २०० वर मुले-मुली सहभागी झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून येथील जेवणामुळे काही विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या होत होत्या. बुधवारी रात्री रात्रीचे जेवण केल्यानंतर अनेक विद्यार्थी उलट्या करू लागले, यातच काही विद्यार्थी चक्कर येऊन पडले. ज्यांची प्रकृती गंभीर झाली अशा १० मुली आणि एका मुलाला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मेयोच्या आकस्मिक विभागात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येत मुलांना पाहून, मेडिसिनच्या सर्व डॉक्टरांना याची माहिती देऊन बोलविण्यात आले. इंटर्न डॉक्टरांनी यात बरीच मदत केली. रात्री उशिरापर्यंत उपचार सुरु होते. तूर्तास कोणी गंभीर नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याची माहिती अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना मिळताच त्यांनी रुग्णालय गाठून प्रकृतीची माहिती घेतली. यावेळी एनसीसीच्या अनेक अधिकाºयांनीही रुग्णालयात धाव घेतली.
एनसीसीच्या ११ विध्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 11:59 PM
सावनेर येथील पिंपळाफाटा येथे ३१ आॅगस्टपासून सुरू असलेल्या एनसीसी कॅम्पमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी रात्रीचे जेवण करताच, अनेकांना उलट्या आणि चक्कर येऊ लागली, यात गंभीर झालेल्या १० मुली आणि एका मुलाला बुधवारी रात्री ९.४५ वाजता इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते.
ठळक मुद्देपिंपळाफाटा येथे होता कॅम्प : तीन दिवसापासून मुलांना होत होता त्रास