या उपक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. मधुसूदन सारडा, महेश झाडे पाटील व महेश डालिया यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच कोरोनात संक्रमित रुग्णांच्या घरी स्वयंपाकाची अडचण येत आहे. अशांच्या घरी अन्न पोहोचवून दिले जात आहे. या उपक्रमात मैथिली सुब्रमण्यम, कुणाल बुधराजा, प्रा. विश्रुत लांडगे, रेणू व राकेश चोटिया, वेदांत बजाज, ॲड. आशिष मेहाडिया, अरुण सिंघानिया, चेतना व हेमंत शर्मा, पद्मावती नायडू, मोहम्मद जावेद खान, अभिजित सिंह, मिहिर लोंढे, महेश लाहोटी, संजय राठी, दीपेश मानधना, डॉ. विद्यागौरी दशपुत्रे, रमाकांत फतेहपुरिया, सुनील तुलसियानी, हेमंत हाडा, साकीब पारेख, रविशंकर गुरुमूर्ती, एस. जयशंकर यांच्या सहकार्यातून ही सेवा पुरविली जात असल्याची माहिती अन्नामृत फाऊंडेशन नागपूर अध्यक्ष डॉ. श्यामसुंदर शर्मा व व्यवस्थापक राजेंद्रन रमण यांनी दिली.
इस्कॉन अन्नामृततर्फे कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांची अन्नसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:08 AM