लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथि निमित्त नागपूर शहर (जिल्हा) कॉंग्रेस कमिटीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राजीव गांधी यांच्या हौतात्म्य दिवसापासुन ते २७ मे रोजी जवाहरलाल नेहरु पुण्यतिथी पर्यत जनसेवा सप्ताह पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. यानिमित्ताने कोरोनाच्या संकटकाळात एक लाख नागरिकांना मास्क तसेच गरीब नागरिकांना भोजनाचे वाटप करण्यात येईल. सोबतच कोरोनाग्रस्तांना औषधेदेखील देण्यात येणार आहे.
शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या छायाचित्रास माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आ. अभिजित वंजारी, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, महामंत्री डॉ. गजराज हटेवार, म.प्र.कॉ कमिटीच्या ओबीसी विभागाचे सरचिटणीस चंद्रकांत हिंगे, ओबीसी विभागाचे अध्यक्ष पंकज निघोट प्रामुख्याने उपस्थित होते. विकास ठाकरे यांनी राजीव गांधी यांच्या जीवनावर तसेच कार्यावर प्रकाश टाकला. सर्व ब्लॉक अध्यक्षांना मास्क वाटप करण्यासाठी त्यांच्या गठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले. जनसेवा सप्ताहादरम्यान गरजूंना ब्लॉक स्तरापासून तर वॉर्ड स्तरापर्यंत मास्कवाटप करावे असे निर्देश ठाकरे यांनी दिले.
यावेळी महेश श्रीवास, मोतीराम मोहाडीकर, दिनेश तराळे, ज्ञानेश्वर ठाकरे, पंकज थोरात, ईरशाद मलीक. अब्दुल शकील, युवराज वैद्य, सुरज आवळे, विश्वेश्वर अहिरकर, सुनील पाटिल उपस्थित होते.
दहशतवादाविरोधात सामूहिक शपथ
राजीव स्पोर्टस फाऊंडेशनचे संजय दुधे यांच्या पुढाकाराने राजीव गांधी चौक, अजनी येथे राजीव गांधी यांच्या पुतळ्यासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दशतवादाविरोधात सामूहिक शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आ.विकास ठाकरे, आ.अभिजित वंजारी, आ.प्रफुल्ल गुडधे प्रामुख्याने उपस्थित होते. राजकुमार रामटेके यांनी आभार मानले. यावेळी हनिफ विकार अहमद खान , गौरव दलाल, मुकुंद डेरे हेदेखील उपस्थित होते.