शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

सक्ती आहे,पण धास्ती नाही!

By admin | Published: February 04, 2016 2:44 AM

राज्यात सर्वत्र लवकरच दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी औरंगाबादमध्ये केली.

जानेवारीत २५१७ वाहनधारकांवर कारवाई : शहरात १२ लाख दुचाकींची संख्या नागपूर : राज्यात सर्वत्र लवकरच दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी औरंगाबादमध्ये केली. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र, सर्वत्र याची अंमलबजावणी होत नाही. आता हा नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करून हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणत्याही प्रकाराच्या आजाराने किंवा नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही अपघातामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या वर्षी शहरात १२५४ अपघात झाले असून यात २६० जणांचा मृत्यू झाला आहे तर १२३३ जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्ते अपघातांची दखल घेत राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५ रोजी परिपत्रक काढून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात मोटरसायकलस्वार आणि त्याच्या मागे बसणाऱ्यास हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. हेल्मेट न घातल्यास आर्थिक दंडाबरोबर दोन तासांचे वाहतूक नियमांसंदर्भात समुपदेशन करण्यात येणार आहे. मात्र गेल्या महिनाभरात या नियमांची काटेकोरपणे सक्ती झाली नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, नागपुरात १४ लाख ५८ हजार वाहनांमधून दुचाकी वाहनांचीच संख्या १२ लाखांवर आहे. यामुळे हेल्मेटची सक्ती करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. (प्रतिनिधी)हेल्मेट नसल्यास चारपट गतीने लागतो मारमोटारसायकल चालकाच्या डोक्याच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे हेल्मेट हे व्यक्तिगत सुरक्षेसाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे. परंतु हेल्मेट नसल्यास ४५ किमी प्रतितासाच्या वेगाने चालणाऱ्या मोटारसायकलीवरून चालक खाली पडल्यास चारपट गतीने मार लागतो. यात डोक्याचे हाड तुटण्याची शक्यता सर्वाधिक असते, असे जागतिक स्तरावर दुचाकी वाहनांच्या अपघातात केलेल्या पाहणीतून समोर आले आहे.तज्ज्ञाच्या मते, सामान्य अवस्थेत उभे राहून खाली पडल्यावर डोक्याला सुमारे ३ किलोग्राम वजनापर्यंत मार लागण्याची शक्यता असते. परंतु चालत्या मोटारसायकलीवरून विना हेल्मेट खाली पडल्यास १२ ते १७ किग्रापर्यंत (इम्पॅक्ट लोड) धडक लागण्याची शक्यता असते. मात्र याच गतीमध्ये इम्पॅक्ट लोडला हेल्मेट ७ किग्रापर्यंत करते. एवढे वजन डोक्याचे हाड सहन करू शकते आणि वाहन चालक वाचू शकतो.