शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

वणवा नियंत्रणासाठी वन अकादमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 1:36 AM

वनांमध्ये वणवा पेटणे ही नवीन बाब नाही. प्राचीन काळापासन ते सुरु आहे. परंतु जंगलातील या आगीमुळे हजारो हेक्टरचे नुकसान होेते. त्यामुळे सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चंंद्रपूर येथे वन वणवा अकादमी स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देवनमंत्री सुधीर मुनगंटीवार : आगीचीही नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वनांमध्ये वणवा पेटणे ही नवीन बाब नाही. प्राचीन काळापासन ते सुरु आहे. परंतु जंगलातील या आगीमुळे हजारो हेक्टरचे नुकसान होेते. त्यामुळे सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चंंद्रपूर येथे वन वणवा अकादमी स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.ही अकादमी ही राज्यस्तरीय आपत्ती निवारण यंत्रणेद्वारे उभारण्यात येईल. आग लागताच त्यावर नियंत्रण मिळवण्याचे काम यामार्फत केले जाईल. यापूर्वी हजार बाय हजार चौरस मीटरमध्ये लागलल्या आगीचीच नोंद करण्यात येत होती. त्यामुळे लहान आगीकडे कुणाचेच लक्ष नव्हते. परिणामी त्याच्या नियंत्रणासाठी ही करता येत नव्हते. आता ३०० बाय ३० मीटरच्या क्षेत्रात लागणाऱ्या आगीचीही नोंद होणार आहे. वणवा अकादमीच्या माध्यमातून यावर नियंत्रण मिळविता येईल. यासाठी आवश्यक गार्ड, आणि ड्रोन व इतर अत्याधुनिक यंत्रसामुग्रीही आणली जाईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.काळ्या बिबट्याबाबत चौकशी सुरुसह्याद्रीच्या पठारातही कही जणांना काळा बिबट आढळून आला होता. त्यामुळे चंद्रपूरमधील ताडोबा जंगलात आढळून आलेल्या काळ्या बिबटाबाबत शस्त्रीय अभ्यास करण्यास सांगण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरू असल्याचे वनमंत्री मुनगंटीवर यांनी सांगितले. तसेच कऱ्हांडला येथील जयचंदबाबत त्यांनी संगितले की, वाघाचे क्षेत्र १२ बाय १२ चौरस किमीचे असते. एका मर्यादेनंतर तो आपले मतदार क्षेत्र बदलतो. जयचंद इतर क्षेत्रात जाण्याची शक्यता आहे. त्याचा तपास सुरू आहे.‘वाघा'चे संवर्धन, युतीचे संकेतसध्या सत्ताधारी भाजप आणि शिवसनेमध्ये ‘वाक्’युद्ध सुरू असून सेनेकडून भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडण्यात येत नाही. दुसरीकडे शिवसेनेकडून येणारी निवडणूक स्वबळावर लढण्याचे जाहीर केले असले तरी भाजपकडून मात्र युतीची भाषा होत आहे. यासंदर्भात मुनगंटीवार यांना युतीमधील वाघ (शिवसेना) भाजपाला त्रास देत अल्याबद्ल विचारणा केली वाघाचे संवर्धन करण्याचेच काम आमचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सहकार्यच राहील. वाघाचे संवर्धन होईल. ते आम्ही करूच. थोडा वेळ लागेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भूमिका सांगितली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दिसेल, असे म्हणत मुनगंटीवार यांनीही अप्रत्यक्षरीत्या सेनेसोबत युती होणार असल्याचे संकेत दिले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारforest departmentवनविभाग