शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

वन विभागाला ‘जय’चा घोर

By admin | Published: July 23, 2016 3:23 AM

गत तीन वर्षे वन विभागातील ज्या वन अधिकाऱ्यांनी ‘जय’ च्या भरवशावर स्वत:ची पाठ थोपटून घेतली, आज तोच ‘जय’ या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी बनला आहे.

पाच पथके रवाना : पीसीसीएफची माहिती नागपूर : गत तीन वर्षे वन विभागातील ज्या वन अधिकाऱ्यांनी ‘जय’ च्या भरवशावर स्वत:ची पाठ थोपटून घेतली, आज तोच ‘जय’ या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी बनला आहे. या वाघाने पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची अक्षरश: झोप उडविली आहे. विशेष म्हणजे, याच कार्यालयाने मोफतची प्रसिद्धी लाटण्यासाठी ‘जय’ ला हिरो बनविले होते. परंतु त्याचा शोध घेणे, या विभागाला डोईजड झाले आहे. मागील तीन महिन्यांपासून गायब असलेल्या ‘जय’वरून राज्यभरात चांगलेच वादळ उठले आहे. शिवाय उलटसुलट चर्चेला उथाण आले आहे. या सर्व चर्चेवर पांघरुण घालण्यासाठी शुक्रवारी पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने घाईगर्दीत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान यांची पत्रपरिषद आयोजित करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान श्री भगवान यांनी ‘जय’ हा उमरेड-कऱ्हांडला जंगलाबाहेर गेला असावा, अशी शक्यता व्यक्त केली. सोबतच त्यांनी ‘जय’ चा युद्धपातळीवर शोध घेतला जात असल्याचेही सांगितले. यासाठी वन विभागाने पाच पथके तयार केले असून, या प्रत्येक पथकात प्रत्येकी पाच लोकांचा समावेश आहे. ही सर्व पथके भंडरा, पवनी, नागझिरा, गोंदिया, वडसा व गडचिरोलीपर्यंतच्या जंगलात शोध घेणार असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ वाईल्डलाईफचे (डब्ल्यूआयआय) डॉ. बिलाल हबीब यांनी ‘जय’ ला लावण्यात आलेल्या रेडिओ कॉलरची सविस्तर माहिती दिली. शिवाय त्यांनी ‘जय’ चा अधिवास हा इतर वाघांच्या तुलनेत फार मोठा राहिला असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, इतर कोणताही वाघ हा साधारण १०० ते १५० चौ. किलो मीटरच्या परिसरात फिरतो. मात्र जय हा तब्बल ५८० चौ. किलोमीटर परिसरात फिरत होता. या तुलनेत उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे क्षेत्र केवळ १९० चौ. किलो मीटर एवढे आहे. त्यामुळे तो यापूर्वी सुद्धा अनेकदा या जंगलातून बाहेर गेला आहे. मात्र तो १५ ते एक महिन्यात पुन्हा परत आला. परंतु मागील १८ एप्रिल २०१६ रोजी पवनी येथे त्याचे शेवटचे लोकेशन मिळाले असून, तेव्हापासून त्याचा शोध घेतला जात आहे. याशिवाय मागील २५ नोव्हेंबर २०१५ रोजी बंद पडलेली रेडिओ कॉलर ही जपानमधील कंपनीकडे परत पाठविण्यात आली असून, तिचा रिपोर्ट आल्यानंतरच ती बंद का पडली ते सांगता येईल, असे ते म्हणाले. या पत्रपरिषदेला पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी व विभागीय वन अधिकारी गिरीश उपस्थित होते. (प्रतिनिधी)