शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

वनविभागाचे योद्धेही मैदानात; वनरक्षणासोबत जपली जातेय सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 8:29 PM

सध्या देशभर कोरोना विषाणूचे संक्रमण पसरत आहे. राज्यातही संख्या दिवसेदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर निघणे आरोग्यासाठी हानिकारक असतानाही वनविभागातील कर्मचारी मात्र रानावनात आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. सोबतच सामाजिक कार्यही करीत आहेत.

ठळक मुद्देपाणस्थळाच्या सफाईकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या देशभर कोरोना विषाणूचे संक्रमण पसरत आहे. राज्यातही संख्या दिवसेदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर निघणे आरोग्यासाठी हानिकारक असतानाही वनविभागातील कर्मचारी मात्र रानावनात आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. सोबतच सामाजिक कार्यही करीत आहेत.पोलीस यंत्रणेप्रमाणेच वनविभागाचा समावेशदेखील अत्यावश्यक सेवेमध्ये आहे. यामुळे या काळातही सर्व वनमजूर, वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी सेवा बजावत आहेत. नागपूर वनविभागातील कर्मचारी-अधिकारी कर्तव्यावर हजर आहेत. नियमित बिट गस्त करणे, रात्र गस्त करणे, वनवणव्याचा हंगाम असल्याने वन्यप्राण्यांकरिता असलेले पाणस्थळ तपासणे, पाणस्थळांची साफसफाई करणे, त्यात वन्यप्राण्यांकरिता पाणी भरणे, कॅमेरा ट्रॅपिंग करणे, तसेच वनवणवा आटोक्यात आणण्याला प्रथम प्राधान्य देत आहेत. या कर्मचाऱ्यांना कोरोनापासूनच्या सुरक्षेसाठी उपवनसंरक्षकांनी मास्क, सॅनिटायझर व हॅण्ड ग्लोव्ह्जचा पुरवठा केला आहे.अंबाझरी वनक्षेत्रात एसआरपीएफची तुकडीवन्यजीवांच्या सुरक्षेसह वनहानी टाळण्यासाठी यंदा अंबाझरी वनक्षेत्रात एसआरपीएफची तुकडी पायदळ गस्त घालत आहे. गरजेच्या ठिकाणी ड्रोन कॅमेºयाचा वापर केला जात आहे. आवश्यक ठिकाणी तात्काळ सेवा देणे व आवश्यक विषयाची माहिती ई-मेल किंवा नेटद्वारे सादर करणे, अशा प्रकारच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर ही तुकडी करत आहे.वनविभाग जपतोय सामाजिक बांधिलकीवनरक्षणासोबतच वनविभागाचे कर्मचारी-अधिकारी कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकीही जपत आहेत. कर्तव्यावरील पोलिसांना आणि व वनकर्मचाऱ्यांना मास्क सॅनिटायझर व हॅण्डग्लोव्ह्ज वाटप केले जात आहे. गरजूंना भोजनदानाचा उपक्रमही वनविभाग राबवीत आहे. सेमिनरी हिल्स व अंबाझरी जैवविविधता उद्यानातून वनकर्मचारी स्वखर्चाने दरररोज ४०० गरजूंना भोजनदान करीत आहेत, तसेच ५०० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसforest departmentवनविभाग