शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

लम्पीपासून वन्यजीवांच्या बचावासाठी वनविभागाचा लसीकरणावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 9:57 AM

रानगवा हा प्राणी या वर्गात मोडत असल्याने त्याच्या संसर्गाची शक्यता वाढली आहे. त्याची शिकार वाघ, बिबटे यांच्याकडून होते. त्यांनी अर्धवट खाल्लेले मांस रानकुत्रे, कोल्हे, लांडगे खातात. यामुळे त्यांच्या माध्यमातून हा आजार जंगलात पसरण्याचा धोका व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देवनक्षेत्रालगतच्या गावांना दक्षतेचा इशारागायवर्गीय वन्यप्राण्यांपासून होऊ शकतो शिरकाव

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गावांमध्ये शिरकाव झालेल्या लम्पी स्किन डिसीजची लागण जंगलातील गायवर्गीय जनावरांना होऊ नये यासाठी वनविभागाने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बफर आणि कोअर क्षेत्रातील गावांमधील जनावरांच्या लसीकरणावर आणि गोठ्यांच्या फवारणीवर भर देणे सुरू केले आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह बोर अभयारण्य, पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये वनविभागाने या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जंगलालगत असलेल्या गावांमधील जनावरे जंगलात चरण्यासाठी जातात. गोचीड, गोमाशी यांच्या माध्यमातून जंगलातील गाय व म्हैसवर्गीय प्राण्यांना याचा संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे. रानगवा हा प्राणी या वर्गात मोडत असल्याने त्याच्या संसर्गाची शक्यता वाढली आहे. त्याची शिकार वाघ, बिबटे यांच्याकडून होते. त्यांनी अर्धवट खाल्लेले मांस रानकुत्रे, कोल्हे, लांडगे खातात. यामुळे त्यांच्या माध्यमातून हा आजार जंगलात पसरण्याचा धोका व्यक्त होत आहे. हे लक्षात घेता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गायी, म्हशी, बकऱ्यांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. सध्या चंद्रपूर जिल्हा लम्पीचा हॉटस्पॉट झाला आहे. वनविभागाने पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने बफर आणि कोअर क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. या गावांमध्यील जनावरांचे लसीकरण, विलगीकरण करण्यावर भर दिला जात आहे. जनावरांचे रक्तनमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जात आहेत.प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर म्हणाले, वनविभागाने दक्षता घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत. पेंच, बोर अभयारण्यात अद्याप तरी वन्यजीवांना लम्पीची लागण नाही. जंगलालगतच्या गावांमधील जनावरांचे लसीकरण, गोठा निर्जंतुकीकरण दरवर्षी केले जात असल्याने या परिसरात लम्पीचा प्रसार बराच आटोक्यात आहे. लम्पीचे प्रमाण अधिक असल्यास वन्यजीवांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले.

ताडोबालगतच्या १२ गावांत चाराबंदीताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या १२ गावांमध्ये वनविभागाने चाराबंदी केली आहे. या सर्व गावांमध्ये लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाची मदत घेतली जात आहेत. लसीकरणासाठी गोट फॉक्स व्हॅक्सिनचे एक हजार डोजेस हेस्टर बायोसायन्सेस पुणे यांच्याकडून खरेदी करण्यात आले आहेत. ताडोबाच्या कोअरमधील रानतळोधी, देवाडा, जुनोना, मोहर्ली, भामडेळी, कोळसा या गावांमधील १,०५१ पैकी ३५० जनावरे लम्पीग्रस्त आढळली. तर, बफरगावमधील पळसगाव, मदनापूर, विहीरगाव, बेलोरा, पिपर्डा, गोंडामोहाळी या सहा गावात ३,५२१ पैकी ३१८ जनावरे बाधित आढळल्याची नोंद वनविभागाने मागील आठवड्यात घेतली आहे.

वन्यजीवांना लम्पीचा धोका नाही : जितेंद्र रामगावकरताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रकल्प संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर म्हणाले, लम्पीची बाधा वन्यजीवांना होत नाही. आपण स्वत: पशुवैद्यकीय अधिकारीही आहेत. वन्यजीवांना लम्पीची बाधा होत नाही, ही वैज्ञानिक माहिती असून ओवायई संस्थेच्या रेकॉर्डवरही ती आली आहे.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवHealthआरोग्य