शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

आरएफओसह वनपाल, सर्व्हेअर निलंबित

By admin | Published: January 25, 2017 2:29 AM

कोंढाळी वन परिक्षेत्रातील अवैध वृक्षकटाई प्रकरणात संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्यासह वनपाल, सर्व्हेअर आणि वनरक्षक अशा चौघांना निलंबित करण्यात आले आहे.

 अवैध वृृक्षकटाई भोवली : कोंढाळी वन परिक्षेत्रातील घटना नागपूर : कोंढाळी वन परिक्षेत्रातील अवैध वृक्षकटाई प्रकरणात संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्यासह वनपाल, सर्व्हेअर आणि वनरक्षक अशा चौघांना निलंबित करण्यात आले आहे. वन परिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) प्रशांत हुमणे, वनपाल (फॉरेस्टर) आर. वाय. साबळे, सर्व्हेअर व्ही. जी. गुरव आणि वनरक्षक एस. एस. मरसकोल्हे अशी त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यासंबंधी नागपूरचे उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांना विचारणा केली असता, त्यांनी प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे या चारही लोकांविरुद्ध निलंबन कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ‘लोकमत’ने गत चार दिवसांपूर्वी ‘संरक्षित जंगलावर चालली कुऱ्हाड’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करून या अवैध वृक्षकटाईचा भंडाफोड केला होता. वन विभागाने ‘लोकमत’च्या त्या बातमीची गंभीर दखल घेत, वेगाने चौकशी पूर्ण करीत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध ही कारवाई केली. वन विभागाच्या या कारवाईने सर्वांचे धाबे दणाणले आहे. या संपूर्ण प्रकरणाची हकीकत अशी, कोंढाळी वन परिक्षेत्रातील मूर्ती येथे प्रवीण मन्ने या व्यक्तीची खसरा क्र. १५५/३ ही शेती आहे; शिवाय त्या शेतीलाच लागून वन विभागाचा खसरा क्र. १५४ मधील संरक्षित जंगल आहे. दरम्यान, संबंधित शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी १५५/३ मधील झाडे कटाईची वन विभागाकडे परवानगी मागितली होती. त्यावर कोंढाळीचे आरएफओ प्रशांत हुमणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी न करता, त्या शेतकऱ्याला झाडे तोडण्याची परवानगी दिली. सोबतच वन विभागाचे सर्व्हेअर व्ही. जी. गुरव यांनीसुद्धा नकाशाची पाहणी न करता खसरा क्र. १५५/३ शेजारी वन विभागाचे कोणतेही जंगल नसल्याचे प्रमाणपत्र दिले. या दोन्ही गोष्टींचा खासगी ठेकेदाराने फायदा घेऊन वन विभागाच्या संरक्षित जंगलातील तब्बल २०० वर सागाच्या झाडांची कत्तल केली. त्या सर्व झाडांची खुल्या बाजारात सुमारे २० ते २५ लाख रुपये किंमत असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाने वन विभाग खडबडून जागा झाला होता. महिनाभरात दोन घटना माहिती सूत्रानुसार मागील महिनाभरात कोंढाळी या एकाच वन परिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यापैकी मूर्ती बिटातील घटनेत ही कारवाई झाली आहे. मात्र यापूर्वी येथील शेकापूर-कुंडी या बिटातसुद्धा अशीच अवैध वृक्षतोड झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्या घटनेचीसुद्धा स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे वन विभागाच्या या कारवाईने वन अधिकारी व कर्मचाऱ्यांसह खासगी ठेकेदारांना धडकी भरली आहे. काही ठेकेदारांनी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अवैध वृक्ष कटाईचा गोरखधंदा चालविला आहे. मात्र नागपूरचे मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी आणि उप वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी दोषीविरुद्ध तडकाफडकी केलेल्या या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. या दोन्ही वन अधिकाऱ्यांची अतिशय शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून वन विभागात ओळख आहे. शिवाय या कारवाईतून त्यांनी ते पुन्हा सिद्ध करून दाखविले आहे. (प्रतिनिधी)